शुक्रवार २३ जून २०१७

Menu

होम >> राशी भविष्य >>
चंद्राचे होणारे भ्रमण नवीन संधी देणारे राहील. संततीच्या उत्कर्षाची वार्ता कानी येईल. नोकरीत अनपेक्षितपणे चांगल्या संधी चालून येतील. मिळालेल्या संधींचा लाभ आपले भविष्य उज्वल करणारा राहील. आर्थिक आवक वाढेल. नावीण्यपूर्ण घडामोडी घडतील. व्यावसायिक भाग्य बीजे पेरली जातील. नोकरीत आपल्या अधिकार कक्षेत वाढ होईल. वरिष्ठांकडून आपल्ङ्मा काङ्काची प्रशंसा होईल. आपले अचूक अंदाज व योग्य व्यक्तींकडून मिळणारी मदत यामुळे आज आपली निकड भागणार आहे. मित्रपरिवाराचे चांगले सहकार्य लाभेल. आपल्या कार्यक्षेत्रातून प्रशिक्षणासाठी आपली निवड केली जाईल. राजकीय, सामाजिक क्षेत्रातून प्रतिष्ठा लाभेल. शुभदिनांक २०,२१

 
वर
होम | ताज्या बातम्या | मुख्य वेबसाइट
Copyright © 2013-2019 Lokmat Media Pvt Ltd
For advertising with us e-mail to onlineads@lokmat.com