Raigad: रायगड लोकसभा मतदार संघाच्या मतपेट्या कडेकोट सुरक्षा व्यवस्थेत

By निखिल म्हात्रे | Published: May 10, 2024 12:44 PM2024-05-10T12:44:29+5:302024-05-10T12:45:07+5:30

Maharashtra Lok Sabha Election 2024: रायगड लोकसभा मतदार संघाच्या अंतर्गत येणाऱ्या पेण, अलिबाग, श्रीवर्धन, महाड, गुहागर व दापोली या विधानसभा मतदार संघामध्ये मतदानाची प्रक्रिया पार पडल्यानंतर सर्व मतदान केंद्रावरील मतपेट्या जिल्हा क्रिडा संकुल नेहुली, अलिबाग या ठिकाणी तयार करण्यात आलेल्या स्ट्रॉग रुममध्ये सुरक्षितपणे ठेवण्यात आल्या आहेत.

Raigad: Raigad Lok Sabha constituency ballot boxes under tight security | Raigad: रायगड लोकसभा मतदार संघाच्या मतपेट्या कडेकोट सुरक्षा व्यवस्थेत

Raigad: रायगड लोकसभा मतदार संघाच्या मतपेट्या कडेकोट सुरक्षा व्यवस्थेत

- निखिल म्हात्रे
अलिबाग - रायगड लोकसभा मतदार संघाच्या अंतर्गत येणाऱ्या पेण, अलिबाग, श्रीवर्धन, महाड, गुहागर व दापोली या विधानसभा मतदार संघामध्ये मतदानाची प्रक्रिया पार पडल्यानंतर सर्व मतदान केंद्रावरील मतपेट्या जिल्हा क्रिडा संकुल नेहुली, अलिबाग या ठिकाणी तयार करण्यात आलेल्या स्ट्रॉग रुममध्ये सुरक्षितपणे ठेवण्यात आल्या आहेत.
स्ट्रॉग रुमच्या सुरक्षेकरिता निवडणूक आयोगाने ठरवून दिलेल्या मानकाप्रमाणे सुरक्षा बंदोबस्त व्यवस्था करण्यात आली आहे. त्या ठिकाणी त्रिस्तरीय सुरक्षा व्यवस्था ठेवण्यात आली आहे. संपूर्ण बंदोबस्त व्यवस्थेचे प्रभारी अधिकारी म्हणून श्री.विनीत चौधरी, उप-विभागीय पोलीस अधिकारी, अलिबाग यांना नियुक्त करण्यात आले आहे.

यामध्ये पहिल्या स्तरामध्ये केंद्रिय सशस्त्र दल CRPF 113 बटालीयन G कंपनी चे एक प्लाटून नेमण्यात आले आहे. या प्लाटूनमधील सशस्त्र जवान हे स्ट्रॉग रुमच्या जवळच्या सर्वात आतील कॉर्डन 1 मध्ये असतील व त्यांची स्ट्रॉग रुम वर 24 तास नजर असेल. तसेच स्ट्रॉग रुममध्ये लावण्यात आलेल्या सी.सी.टी.व्ही.चे कंट्रोल रुम यांच्या ताब्यात असेल. दुस-या स्तरामध्ये राज्य सशस्त्र दल SRPF ग्रुप 8, मुंबई येथील एक प्लाटून नेमण्यात आले आहे. या प्लाटूनमधील सशस्त्र जवान हे स्ट्रॉग रुमच्या जवळच्या कॉर्डन 2 मध्ये असतील व त्यांची कॉर्डन - 1 च्या बाहेरील परिसरामध्ये 24 तास पेट्रोलिंग असेल तसेच यातील वॉच टॉवरवर तैनात जवान आजुबाजूच्या परिसरावर नजर ठेवून असतील.
तिस-या स्तरामध्ये रायगड पोलीस दलातील 6 अधिकारी व 40 पोलीस अंमलदार यांची नेमणूक करण्यात आली आहे. त्यामध्ये सशत्र अंमलदारांचाही समावेश असेल. हे अंमलदार स्ट्रॉग रुमच्या जवळच्या कॉर्डन - 3 मध्ये असतील व त्यांची कॉर्डन 2 च्या बाहेरील परिसरात तसेच जिल्हा क्रिडा- संकूलाच्या आजुबाजूच्या संपूर्ण परिसरामध्ये 24 तास गस्त असेल. जिल्हा क्रिडा संकुलामध्ये प्रवेश करण्या-या प्रत्येक वाहनाची तसेच प्रत्येक व्यक्तीची मुख्य प्रवेशद्वाराजवळ तपासणी केली जाईल व केवळ अधिकृत व्यक्ती व वाहनांनाच प्रवेश दिला जाईल.

जिल्हा क्रिडा संकुलाच्या परिसरामध्ये सी.सी.टी.व्ही. बसवण्यात आले असून त्याद्वारेही परिसरात नजर ठेवली जाणार आहे. संपूर्ण बंदोबस्तामध्ये बंदोबस्तामधील जवानांमध्ये आपसात समन्वय ठेवण्यासाठी बिनतारी संदेशवहन/दळणवळनाची सुविधा असून त्याद्वारे रायगड पोलीस दलाच्या मुख्य नियंत्रण कक्षाचे अधिकारी संपूर्ण बंदोबस्तावर लक्ष ठेवून असणार आहेत.

Web Title: Raigad: Raigad Lok Sabha constituency ballot boxes under tight security

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.