...ताईंनी  हे एकच हक्काचं काम केलं, भाजप नेत्या चित्रा वाघ यांची सुप्रिया सुळे यांच्यावर टीका

By ऑनलाइन लोकमत | Published: May 2, 2024 11:45 PM2024-05-02T23:45:14+5:302024-05-02T23:46:10+5:30

बारामती येथे भाजप कार्यालयात पत्रकारांशी बोलताना चित्रा वाघ यांनी हि टीका केली.त्या पुढे म्हणाल्या सुळे यांच्या कार्यअहवालात ‘अजितदादां’नी केलेलीच कामे दाखविण्यात आली आहेत.त्यामुळे तो कार्यअहवाल नक्की कोणाचा,असा प्रश्न पडतो,असे चित्रा वाघ म्हणाल्या.

Tai did this work of only one right, BJP leader Chitra Wagh criticizes Supriya Sule | ...ताईंनी  हे एकच हक्काचं काम केलं, भाजप नेत्या चित्रा वाघ यांची सुप्रिया सुळे यांच्यावर टीका

...ताईंनी  हे एकच हक्काचं काम केलं, भाजप नेत्या चित्रा वाघ यांची सुप्रिया सुळे यांच्यावर टीका

बारामती - गाडीमध्ये कोणाला तरी बसवायचं, लगेच रिल्स तयार करायची, ती सोशल मिडियावर पोस्ट करायची, आणि त्याला कॅप्शन द्यायचे ताई माझ्या हक्काची. हे एकच हक्काचं काम त्यांनी केले. मोठ्या ताईंचा एकेक व्हिडीओ पाहून मला हसूही येते अन् वाईटही वाटतं. सध्या त्यांची वाढलेली धावपळ आणि मानसिक संतुलन ढासळलेले पाहत आहे, अशा शब्दात भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी खासदार सुप्रिया सुळे यांच्यावर बोचरी टीका केली.

बारामती येथे भाजप कार्यालयात पत्रकारांशी बोलताना चित्रा वाघ यांनी हि टीका केली.त्या पुढे म्हणाल्या सुळे यांच्या कार्यअहवालात ‘अजितदादां’नी केलेलीच कामे दाखविण्यात आली आहेत.त्यामुळे तो कार्यअहवाल नक्की कोणाचा,असा प्रश्न पडतो,असे चित्रा वाघ म्हणाल्या.

यावेळी,पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पुण्यातील सभेच्या भाषणात नाव न घेता अप्रत्यक्ष शरद पवार यांना भटकत्या आत्म्याची उपमा दिली होती. या प्रश्नावर वाघ म्हणाल्या, साहेबांनी का जीवाला लागून घेतले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी तर कुणाचाही नाव घेतले नाही. ज्याने त्याने आपापल्या अंगाला लावून घेतले तर त्याला आम्ही काय करणार. नाव न घेताच आम्हालाच बोलले असं म्हणण चुकीचं असल्याचा टोला त्यांनी लगावला.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्यावर टीका केल्यानंतर शिवसेना नेते संजय राऊत यांनी याबाबत प्रतिक्रिया दिली होती. यावर चित्रा वाघ म्हणाल्या की, संजय राऊतांचे काय ऐकता. ते सर्व ज्ञानी आहेत. ते काँग्रेसच्या फडावर तुणतुण घेऊन नाचायचं काम करतात. लोकांना फसवून आर्थिक घोटाळ्यामध्ये जामिनावर सुटलेले ते आरोपी असल्याचे त्या म्हणाल्या.

ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी घरातील आणि बाहेरील अशी केलेली संभावना धक्कादायक असल्याचे त्या म्हणाल्या. बारामतीची सूनच लोकसभेत जाईल असे त्या म्हणाल्या.
 

Web Title: Tai did this work of only one right, BJP leader Chitra Wagh criticizes Supriya Sule

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.