डिप्रेशन आलंय, करु काय ? रीलॅक्स !

By admin | Published: September 4, 2014 04:55 PM2014-09-04T16:55:47+5:302014-09-04T16:55:47+5:30

नैराश्याची भावना जाणवण्याची कारणं अवतीभोवती बरीच असतात. आजकालच्या धकाधकीच्या जीवनात तर रोज उठून अशा अनेक प्रसंगांना तोंड द्यावं लागतं तेव्हा मन निराश होऊन जातं.

Depression, do you? Relex! | डिप्रेशन आलंय, करु काय ? रीलॅक्स !

डिप्रेशन आलंय, करु काय ? रीलॅक्स !

Next
>विचार बंद, काम सुरु!
 
डॉ. संज्योत देशपांडे 
 
नैराश्याची भावना जाणवण्याची कारणं अवतीभोवती बरीच असतात. आजकालच्या धकाधकीच्या जीवनात तर रोज उठून अशा अनेक प्रसंगांना तोंड द्यावं लागतं तेव्हा मन निराश होऊन जातं.
आणि फार मोठय़ा नाही, अगदी छोटय़ा छोटय़ा गोष्टींनीही मन दुखावतं.
आपण यादी करुन पाहू, काय असतात ती कारणं.
1) खूप प्रयत्न करून, कष्ट करुन, वाट पाहूनही जेव्हा हवी तेव्हा हवी ती गोष्ट हाती लागत नाही.
2) आपल्या जवळची व्यक्ती तिच्या हिताचं वारंवार समजावून सांगूनही ऐकत नाही.
3) कधी कधी एखाद्या प्रसंगात अडकून पडल्यासारखं होतं आणि तिथून बाहेर पडण्याचा मार्गच दिसत नाही.
4) आपण घेतलेला निर्णय चुकला असं एकदम लक्षात येतं. 
तुम्ही कराल तेवढी ही यादी मोठी होत जाईल. आणि मग असं काही सतत घडत राहिलं की मन निराश होऊन जातं. हताश वाटतं आणि समोर रस्ता दिसेनासाच होतो. त्या क्षणाला तरी सगळंच संपल्यासारखं वाटतं. सर्वच गोष्टी निर्थक वाटतात. निराश तर वाटतंच, पण मनात चिंता, राग, वैफल्य  भावनांचं मिश्रणही मनात तयार होतं. नैराश्य ही अतिशय स्वाभाविकपणो जाणवणारी भावना आहे. पण ब:याचदा आपला स्वत:वरच टीका करणारा आतला आवाजही आपल्याला नैराश्य देतो. 
स्वत:चाच राग येतो. मीच कमी पडतो, चुकतो, मुर्ख असं काहीतरी वाटतं. म्हणजे काय तर नैराश्य जाणवणा:या व्यक्तीला मनातून स्वत:विषयी छान वाटत नाही. आपली स्वत:चीच किंमत स्वत:च्या नजरेतून कमी झालेली असते आणि मग स्वत:विषयी खूप नकारात्मक वाटू लागतं.
नेहमीच काही असे विचार वाईट नसतात. पण आपल्या जगण्यात ही भावना वारंवार जाणवायला लागली तर  गडबड होते. आपण स्वत:लाच पाण्यात पहायला लागतो आणि मग सतत निराश वाटण्याशी इतरांपेक्षा स्वत:चा संबंध जास्त असतो. 
आपल्या विचार करण्याच्या पद्धतीशी, आपल्या दृष्टिकोनाशी, आपण स्वत:कडे कसं पाहतो याच्याशीही त्याचा संबंध असतो. अगदी छोटय़ा छोटय़ा गोष्टीतून स्वत:वर टीका करत राहिलं तर या भावनेची तीव्रता वाढतच जाते.
तुम्ही खूप डिप्रेस्ट असाल तर नेमकी गडबड काय आहे, हे जरा शोधून पहा.
एकतर नैराश्य यायलाच नको असं म्हणू नका. निराशा प्रत्येक माणसाला वाटते. पण तिचा नीट उपयोग केला तर हे नैराश्य तुम्हाला तुमच्या आत डोकावून पाहायला भाग पाडते. तुम्ही आता थांबायला हवं आणि परिस्थितीचा योग्य आढावा घेऊन विचार करायला हवा याची जाणीव करून देते.
काही वेळेला रोजच्या दिनक्रमात आपण स्वत:कडे योग्य लक्ष देत नाही. मनाच्या एका पातळीवर काही गोष्टी जाणवत असतात; पण त्याकडेही लक्ष द्यायला कदाचित कुणालाच फुरसत नसते. अशा वेळेला अनेक जणांना ही भावना कमी-अधिक तीव्रतेमध्ये जाणवत राहतं. त्यामुळे नैराश्य जाणवत असेल तर स्वत:चा विचार करण्याची ही वेळ आहे. स्वत:ला तपासून पाहण्याची, आपल्याला आपल्या आयुष्यातलं काय बोचतंय हे समजून घेण्याची, स्वत:मध्ये काही बदल घडवून आणण्याची ही वेळ आहे, असं समजायला हरकत नाही. 
 
का वाटतं डिप्रेस्ट? ही यादी तपासा.
 
डिप्रेस्टच वाटत नाही, असा एकही माणूस जगात नाही. पण काहीजण आपल्या नैराश्याचा पॉङिाटिव्हली उपयोग करुन घेतात. आणि त्यातून मार्ग काढतात. तसा मार्ग तुम्हाला शोधायचा असेल तर हे करुन पहा.
1) नैराश्य ही भावना आपल्याला किती वेळा जाणवते याकडे लक्ष ठेवा.
2) त्या भावनेची तीव्रता तपासून पाहा.
3) कालावधी लक्षात घ्या. म्हणजे काय की, साधारण कितीवेळ आपण निराश असतो, याचा अंदाज घ्या. म्हणजे मला नैराश्य आलं तर दोन दिवस तसाच मूड राहातो की आणखी वेळ, हे तपासा.
4) नैराश्य जाणण्यासाठी घडलेले/घडणारे प्रसंग कोणते ते लिहून काढा.
5) त्या प्रत्येक प्रसंगाचा तुम्ही काय अर्थ काढला, हे लक्षात घ्या. म्हणजे
मला परीक्षेत मार्क कमी मिळाले म्हणजे माङयात काही अर्थच नाही असं वाटून तुम्ही फक्त दोष देत बसला की, उपाय काय याचाही विचार केला.
6) नैराश्याच्या विचारांचा रवंथ करून त्याची तीव्रता अजून वाढवली की
त्यातून बाहेर पडण्याचा प्रयत्न केला!
7) पर्याय शोधण्याचा प्रयत्न केला की, डेडएण्डच आहे अशी मनाची
समजूत करून घेतली!
8) प्रत्येक गोष्टीचा टोकाचा अर्थ लावणं किंवा कोणत्याही गोष्टीचा
नकारात्मक विचार करणं ही तुमची मानसिकता झाली आहे का?
9) समोर असणारी परिस्थिती आणि आपले विचार यात कोणती गोष्ट
माङया नियंत्रणातली आहे, असं तुम्हाला वाटतं?
1क्) नैराश्य जाणवायला तुम्ही स्वत:, तुमचा गोष्टींकडे पहाण्याचा
दृष्टीकोन किती जबाबदार आहे? हे सारे शोधा, तुमची तुम्हालाच काही उत्तरं सापडतील.
 
तुम्ही डिप्रेस्ट असाल तर, रोज या गोष्टी नियमित करुन पहा. 
 
1) सगळ्यात महत्त्वाचं रोज नियमितपणो व्यायाम करा.
2) योग्य आहार घ्या. आराम करा, निरोगी जीवनशैली स्वीकारा आणि स्वत:ची  काळजी घ्या.
3) जवळच्या मित्र-मैत्रिणींसोबत मन मोकळं करा.
4) स्वत:च्या नकारात्मक विचारांना खतपाणी घालू नका.
5) नकारात्मक व मदत न करणा:या विचारांना बदलण्याचा प्रयत्न करा.
6) स्वत:च्या मनातले टोकाचे, हट्टाग्रही, दुराग्रही विचार कमी करा. दृष्टिकोन बदलण्याचा प्रयत्न करा.
7) स्वत:विषयी कमतरतेची भावना निर्माण होईल अशा विचारांना सकारात्मक विचारांनी बदला.
8) स्वत:वर, स्वत:च्या क्षमतांवर विश्वास ठेवा.
9) स्वत:ला विनाकारण शिक्षा करू नका.
10) समुपदेशकाचा सल्ला न लाजता घ्या. गरज पडल्यास कौन्सिलरची मदत घ्या.
 

Web Title: Depression, do you? Relex!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.