'तेजस्वी सूर्या गुंडगिरी करतात, मासे खातात'; काँग्रेसवर टीका करताना कंगनाने भाजप नेत्याला केलं लक्ष!

By ऑनलाइन लोकमत | Published: May 5, 2024 11:13 AM2024-05-05T11:13:03+5:302024-05-05T11:13:15+5:30

Kangana Ranaut : राहुल गांधींवर टीका करताना कंगना रणौतने भाजप नेत्यावर निशाणा साधला आहे.

While criticizing Rahul Gandhi, Kangana Ranaut targeted the BJP leader | 'तेजस्वी सूर्या गुंडगिरी करतात, मासे खातात'; काँग्रेसवर टीका करताना कंगनाने भाजप नेत्याला केलं लक्ष!

'तेजस्वी सूर्या गुंडगिरी करतात, मासे खातात'; काँग्रेसवर टीका करताना कंगनाने भाजप नेत्याला केलं लक्ष!

Himachal Pradesh Loksabha Election : हिमाचल प्रदेशच्या मंडी लोकसभा मतदारसंघातून अभिनेत्री कंगना रणौत निवडणूक लढवत आहे. कंगना रणौतसमोर काँग्रसेच्या विरोधात विक्रमादित्य सिंह यांचे आव्हान असणार आहे. आपल्या वक्तव्यांमुळे कायमच चर्चेत असणारी कंगना आता निवडणुकीमुळे देखील चर्चेत आलीय. अशातच कंगनाने निवडणकीच्या प्रचारादरम्यान, भाजपच्याच खासदारावर जोरदार टीका केली आहे. भाजप खासदारावर कंगनाने केलेल्या वक्तव्याने आश्चर्य व्यक्त होतंय. मात्र कंगनाने बोलण्याच्या ओघात भाजप नेत्याला लक्ष केल्याचं फार उशीरा समोर आलं.

शनिवारी निवडणूक प्रचारादरम्यान कंगनाने हे विधान केलं आहे. विरोधी पक्षांच्या राजकुमारांचा उल्लेख करत त्यांनी राहुल गांधींवर निशाणा साधला आणि त्यानंतर कंगनाने तेजस्वी सूर्यांचं नाव घेत त्यांना गुंड आणि मासे खाणारा म्हटलं. तेजस्वी सूर्या स्वतः भाजपच्या नेते आणि कर्नाटकातील पक्षाचे खासदारही आहेत. कंगनाच्या या तेजस्वी सूर्या यांच्यावर केलेल्या टीकेनं आश्चर्य व्यक्त करण्यात येतंय.

मंडी लोकसभा मतदारसंघातील सरकाघाट विधानसभा मतदारसंघात कंगनाने जाहीर सभेला संबोधित केले. 'आपण कुठे येत आहोत आणि कुठे जात आहोत, हे त्यांनाच कळत नाही. अशा बिघडलेल्या राजपुत्रांचा हा पक्ष आहे. मग ते चंद्रावर बटाटे पिकवणारे राहुल गांधी असोत किंवा मासे खाऊन गुंडगिरी करणारे तेजस्वी सूर्य असोत किंवा अखिलेश यादव असतील, जे असे फालतू बोलतात. आपलाही एक राजकुमार आहे, ज्याला भारतात आजवर कोणी ओळखत नव्हते. त्यांना फक्त हिमाचल प्रदेशातच ओळखत होते. पण आता त्याने अशा काही कमेंट केल्या आहेत की ही महिला (कंगना) अपवित्र आहे, मी अपवित्र आहे आणि येथून निघून जावे, असे त्याने मला सांगितले. ही आपल्यासाठी चिंतेची बाब आहे,' असं कंगना म्हणाली.

दुसरीकडे, कंगनाला तेजस्वी सूर्या यांच्या ऐवजी राष्ट्रीय जनता दलाचे नेते तेजस्वी यादव याचं नाव घ्यायचं होतं. तेजस्वी यादव यांनी काही दिवसांपूर्वीच निवडणूक प्रचारादरम्यान, मासे खात असल्याचा व्हिडीओ शेअर केला होता. हा व्हिडिओ त्यांनी चैत्र नवरात्रीच्या पहिल्याच दिवशी शेअर केला होता, ज्यामुळे यादव यांच्यावर बरीच टीका झाली होती. पण इकडे कंगनाने बोलण्याच्या ओघात तेजस्वी यादव यांच्याऐवजी तेजस्वी सूर्या यांचे नाव घेतलं.
 

Web Title: While criticizing Rahul Gandhi, Kangana Ranaut targeted the BJP leader

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.