बंगळुरू उत्तर मतदारसंघ बदलाचा भाजपाच्या शाेभा करंदलाजे यांना फायदा?

By ऑनलाइन लोकमत | Published: April 24, 2024 11:36 AM2024-04-24T11:36:48+5:302024-04-24T11:37:33+5:30

या मतदारसंघाचे २०१४ आणि २०१९ मध्ये भाजपचे माजी मुख्यमंत्री डी. बी. सदानंदगाैडा यांनी प्रतिनिधित्व केले हाेते.

Loksabha Election - BJP's Shobha Karandlaje benefits from Bengaluru North Constituency change? | बंगळुरू उत्तर मतदारसंघ बदलाचा भाजपाच्या शाेभा करंदलाजे यांना फायदा?

बंगळुरू उत्तर मतदारसंघ बदलाचा भाजपाच्या शाेभा करंदलाजे यांना फायदा?

डॉ. वसंत भोसले

बंगळुरू : कर्नाटकाच्या राजधानीतील बंगळुरू उत्तर मतदारसंघाची निवडणूक नेहमीच प्रतिष्ठेची मानली जाते. काही अपवाद वगळले तर या मतदारसंघाच्या उमेदवारांनी सातत्याने केंद्रीय मंत्रिमंडळात प्रतिनिधित्व केले आहे. केंद्रीय कृषि खात्याच्या राज्यमंत्री शाेभा करंदलाजे यांना भाजपने उमेदवारी दिल्याने पुन्हा येथील लढत लक्षवेधी हाेत आहे. 

या मतदारसंघाचे २०१४ आणि २०१९ मध्ये भाजपचे माजी मुख्यमंत्री डी. बी. सदानंदगाैडा यांनी प्रतिनिधित्व केले हाेते. यावेळी त्यांची उमेदवारी नाकारून चिक्कमंगळूर-उडप्पीच्या खासदार शाेभा करंदलाजे यांना भाजपने उमेदवारी दिली. शाेभा करंदलाजे यांना चिक्कमंगळुरूमधून तीव्र विराेध झाल्याने येथून उमेदवारी दिली गेली. काॅंग्रेसने येथे प्रवक्ते प्रा. राजीव गाैडा यांना उमेदवारी दिली आहे. 

निवडणुकीतील कळीचे मुद्दे
सदानंद गाैडा यांना उमेदवारी नाकारल्याने कार्यकर्त्यांत नाराजी. गाैडा यांच्या नाराजीचा फटका भाजपला बसण्याची शक्यता.
शाेभा करंदलाजे यांचा शहरी मतदारसंघात संपर्क नसणे.
उच्चभ्रु समाजात राजीव गाैडा यांच्या चांगल्या प्रतिमेचा परिणाम. 
बंगळुरू शहराचे नागरीक प्रश्न तीव्र, उपनगरात पाणीटंचाई

Web Title: Loksabha Election - BJP's Shobha Karandlaje benefits from Bengaluru North Constituency change?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.