238 वेळा पराभूत झाल्यावरही पुन्हा निवडणूक लढवण्यास तयार; लिम्का बुक ऑफ रेकॉर्डमध्ये नोंद

By ऑनलाइन लोकमत | Published: March 28, 2024 03:46 PM2024-03-28T15:46:28+5:302024-03-28T15:53:36+5:30

Padmaranjan And Lok Sabha Election 2024 : पद्मराजन यांनी तब्बल 238 वेळा निवडणुकीत पराभव झाल्यानंतरही पुन्हा एकदा आगामी लोकसभा निवडणूक लढवण्याची तयारी सुरू केली आहे.

Lok Sabha Election 2024 padmaranjan who lost 238 elections will again contesting for polls | 238 वेळा पराभूत झाल्यावरही पुन्हा निवडणूक लढवण्यास तयार; लिम्का बुक ऑफ रेकॉर्डमध्ये नोंद

फोटो - AFP

तामिळनाडूच्या पद्मराजन यांनी तब्बल 238 वेळा निवडणुकीत पराभव झाल्यानंतरही पुन्हा एकदा लोकसभा निवडणूक लढवण्याची तयारी सुरू केली आहे. 65 वर्षीय पद्मराजन हे एका टायर रिपेअर शॉपचे मालक आहेत. त्यांनी 1988 मध्ये तामिळनाडूमधील मेत्तूर येथून निवडणूक लढवण्यास सुरुवात केली. जेव्हा त्यांनी निवडणूक लढवणार असल्याचं सांगितले तेव्हा लोक त्यांची खिल्ली उडवायचे पण एक सामान्य माणूसही निवडणुकीत भाग घेऊ शकतो हे त्यांना सर्वांना दाखवून द्यायचं होतं.

पद्मराजन म्हणाले की, "सर्व उमेदवारांना फक्त निवडणुकीत जिंकायचं असतं पण माझ्याबाबतीत तसं नाही. केवळ निवडणुकीत भाग घेतल्याने मला आनंद होतो आणि आपण जिंकलो किंवा हरलो याने काही फरक पडत नाही. पराभूत होऊनही आनंदी आहे." ते आताही तामिळनाडूच्या धर्मपुरी जिल्ह्यातून निवडणूक लढवत आहेत. "इलेक्शन किंग" म्हणून प्रसिद्ध असलेले पद्मराजन यांनी देशभरात झालेल्या राष्ट्रपतीपदापासून ते स्थानिक निवडणुकांमध्ये भाग घेतला आहे. 

"जिंकणं ही दुसरी गोष्ट आहे. मी निवडणुकीत कोणाच्या विरोधात उभा आहे, यानेही मला काही फरक पडत नाही" असंही त्यांनी म्हटलं आहे. मात्र, निवडणूक लढवणे त्यांच्यासाठी अजिबात सोपं राहिलेलं नाही. गेल्या अनेक वर्षांत निवडणुकांवर लाखो रुपये खर्च केले आहेत. भारतातील सर्वात अयशस्वी उमेदवार म्हणून लिम्का बुक ऑफ रेकॉर्डमध्ये स्थान मिळवलं आहे.

"मला एकाही मताची आशा नव्हती पण तरीही लोकांनी माझ्यासाठी मतदान केलं, मला स्वीकारलं. लोकं आपला उमेदवारी अर्ज दाखल करताना संकोच करतात, म्हणूनच मला त्यांच्यामध्ये जागरूकता निर्माण करण्यासाठी एक रोल मॉडल बनायचं आहे. मी शेवटच्या श्वासापर्यंत निवडणूक लढवत राहीन पण कोणतीही निवडणूक जिंकलो तर मलाच आश्चर्य वाटेल" असं पद्मराजन यांनी म्हटलं आहे. एनडीटीव्हीने याबाबतचे वृत्त दिले आहे. 
 

Web Title: Lok Sabha Election 2024 padmaranjan who lost 238 elections will again contesting for polls

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.