'कान उघडून ऐका, मोदी जिवंत असेपर्यंत...', OBC आरक्षणावरुन PM मोदींचा काँग्रेसवर घणाघात

By ऑनलाइन लोकमत | Published: April 25, 2024 03:48 PM2024-04-25T15:48:53+5:302024-04-25T15:49:36+5:30

Lok sabha Election 2024: 'काँग्रेस असा पक्ष आहे, जो पदोपदी बाबासाहेबांचा अपमान करतो, राज्यघटनेचा अपमान करतो आणि सामाजिक न्यायालाही नष्ट करण्याचा प्रयत्न करतो.'

Lok sabha Election 2024: 'Open your ears and listen, till Modi lives...', PM Modi attacks Congress over OBC reservation | 'कान उघडून ऐका, मोदी जिवंत असेपर्यंत...', OBC आरक्षणावरुन PM मोदींचा काँग्रेसवर घणाघात

'कान उघडून ऐका, मोदी जिवंत असेपर्यंत...', OBC आरक्षणावरुन PM मोदींचा काँग्रेसवर घणाघात

UP Lok sabha Election 2024: लोकसभा निवडणुकीच्या दुसऱ्या टप्प्यात शुक्रवारी(दि.26) उत्तर प्रदेशातील आठ जागांवर मतदान होणार आहे. या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काँग्रेस आणि समाजवादी पक्षावर जोरदार निशाणा साधला. संविधान धोक्यात असल्याच्या INDIA आघाडीच्या आरोपांना पंतप्रधानांनी चोख प्रत्युत्तर दिले. संविधान निर्माण करणाऱ्या बाबासाहेब आंबेडकरांचा काँग्रेस पदोपदी अपमान करत असल्याची टीका पंतप्रधानांनी केली.

आग्रा येथे जाहीर सभेत बोलताना नरेंद्र मोदी म्हणाले की, काँग्रेस असा पक्ष आहे, जो पदोपदी बाबासाहेबांचा अपमान करतो, राज्यघटनेचा अपमान करतो आणि सामाजिक न्यायालाही नष्ट करण्याचा प्रयत्न करतो. त्याच काँग्रेसने कधी कर्नाटकात, कधी आंध्र प्रदेशात आपल्या जाहीरनाम्यात धर्माच्या आधारावर आरक्षणाचा पुरस्कार केला. सपा-काँग्रेसची आघाडी तर तुष्टीकरणात गुंतलेली आहे. 2024 च्या निवडणुकीसाठी काँग्रेसने जाहीर केलेल्या जाहीरनाम्यावर 100% मुस्लिम लीगची छाप दिसते. काँग्रेसचा संपूर्ण जाहीरनामा फक्त व्होट बँक मजबूत करण्यासाठी आहे. तर, भाजपचा जाहीरनामा देशाला बळकट करण्यासाठी आहे. काँग्रेस-सपाची मैत्री तुष्टीकरणाच्या राजकारणावर आधारित आहे. 

हे तुष्टीकरणाचे राजकारण 
पंतप्रधान पुढे म्हणाले, हे दोघे मिळून आपल्या भाषणात ओबीसींबद्दल बोलतात आणि आपली व्होट बँक मजबूत करण्यासाठी मागच्या दाराने ओबीसींचे हक्क हिसकावून घेऊ इच्छितात. आता काँग्रेसने धर्माच्या आधारावर आरक्षण देण्याचा निर्णय घेतला आहे. त्यासाठी 27% OBC कोट्यापैकी काही भाग चोरून, हिसकावून आरक्षण द्यावे, असा मार्ग काँग्रेसने शोधला आहे. पण, आमचा मार्ग तुष्टीकरणाचा नसून, समाधानाचा आहे. सबका साथ, सबका विकास हा आमचा मंत्र आहे. आमचे विचार असे आहेत की, कोणतीही सरकारी योजना असो, त्याचा लाभ सर्व जादी-धर्मातील लोकांना मिळायला हवा. कोणताही भेदभाव न करता, कोणत्याही प्रकारची वैयक्तिक बाब न ठेवता, लाच न घेता प्रत्येकाचे हक्क मिळायला हवा, हाच खरा सामाजिक न्याय असतो.

काही लोकांना भारताची वाढती शक्ती आवडत नाही
काही लोकांना भारताची वाढती शक्ती आवडत नाही. आता देशात संरक्षण कॉरिडॉर तयार होत आहे, सैन्य स्वावलंबी होत आहे. भारत जगाला शस्त्रे निर्यात करत आहे. जगभर असे अनेक  शस्त्र दलाल आहेत, ज्यांना जुन्या सरकारप्रमाणे मलाई खायला मिळत नाही. असे सर्व लोक आता अस्वस्थ आणि खूप संतापले आहेत. भारतीय लष्कराने स्वावलंबी व्हावे असे त्यांना वाटत नाही, त्यामुळेच ते मोदींविरोधात एकवटले आहेत. या शक्तींना रोखण्यासाठी, देशाच्या उज्ज्वल भविष्यासाठी, देशाच्या सुरक्षेसाठी पुन्हा एकदा भाजप आणि एनडीएचे सरकार आणणे अत्यंत आवश्यक आहे, अशी टीकाही पीएम मोदींनी यावेळी केली.

Web Title: Lok sabha Election 2024: 'Open your ears and listen, till Modi lives...', PM Modi attacks Congress over OBC reservation

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.