शांतिगिरी महाराजांचा सहा मतदार संघात पाठींबा कोणाला? आज भूमिका जाहीर करणार

By संजय पाठक | Published: May 10, 2024 09:50 AM2024-05-10T09:50:18+5:302024-05-10T09:50:55+5:30

लोकसभा निवडणुकीत अपक्ष उमेदवारी करून महायुतीला धक्का देणाऱ्या शांतिगिरी महाराज यांनी सहा मतदार संघात विविध उमेदवारांना पाठिंबा देण्याचा निर्णय घेतला आहे.

lok sabha election 2024 Who supports Shantigiri Maharaj in six constituencies? The role will be announced today | शांतिगिरी महाराजांचा सहा मतदार संघात पाठींबा कोणाला? आज भूमिका जाहीर करणार

शांतिगिरी महाराजांचा सहा मतदार संघात पाठींबा कोणाला? आज भूमिका जाहीर करणार

संजय पाठक

नाशिक- लोकसभा निवडणुकीत अपक्ष उमेदवारी करून महायुतीला धक्का देणाऱ्या शांतिगिरी महाराज यांनी सहा मतदार संघात विविध उमेदवारांना पाठिंबा देण्याचा निर्णय घेतला आहे.  हा पाठिंबा कोणाला देणार याबाबत दुपारी ते पत्रकार परिषदेत भूमिका स्पष्ट करणार आहेत.  शांतिगिरी महाराज नाशिक मधून अपक्ष उमेदवारी करत आहेत त्यांनी शिवसेनेच्या शिंदे गटाकडे यापूर्वी उमेदवारी मागितली होती मात्र ती न मिळाल्याने त्यांनी आधी शिवसेनेचे उमेदवार म्हणून उमेदवारी अर्ज दाखल केला होता, मात्र एबी फॉर्म न मिळाल्याने  त्यांनी अपक्ष अर्ज कायम ठेवला आहे.

त्यांच्या उमेदवारीने हिंदू मतांची विभागणी होणार असल्याने महायुती अडचणीत असताना आता अन्य मतदार संघात त कोणाला पाठिंबा द्यायचा याबाबत त्यांनी काही निर्णय घेतला आहे. हा निर्णय दुपारी  परिषदेमध्ये सांगणार आहे नाशिक जिल्ह्यातील दिंडोरी तसेच अहमदनगर जिल्ह्यातील शिर्डी तसेच संभाजीनगर, धुळे जळगाव, जालना या मतदारसंघातील काही उमेदवारांना ते पाठिंबा देणार आहेत.

राज्यातील सात लोकसभा मतदारसंघात बाबाजी भक्त परिवाराचा प्रभाव आहे त्यामुळे त्यांनी यापूर्वी मनसे अध्यक्ष राज ठाकरे तसेच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली होती त्यानंतर स्वतः देखील उमेदवारी मागितली होती मात्र त्यात यश न आल्याने त्यांनी नाशिक मधून उमेदवारी जाहीर केली आहे. आता उर्वरित सहा मतदारसंघात ते कोणाला पाठिंबा देतात याविषयी उत्सुकता आहे.

Web Title: lok sabha election 2024 Who supports Shantigiri Maharaj in six constituencies? The role will be announced today

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.