जागतिक पुरुष दिन : ‘अ‍ॅप’ देणार पुरुषांची साथ, तक्रारींसाठी ‘वास्तव’चे नवे व्यासपीठ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 19, 2017 01:51 AM2017-11-19T01:51:06+5:302017-11-19T01:51:21+5:30

महिलांप्रमाणेच पुरुषांच्या न्याय्य हक्कांसाठी काम करणा-या अनेक संघटना आहेत. मात्र पुरुषांच्या हक्कांसाठी लढणा-या संघटना फारच तुरळक आहेत. त्यामुळे आता १९ नोव्हेंबर, जागतिक पुरुष दिनाच्या निमित्ताने पुरुषांच्या हक्कांसाठी काम करणा-या वास्तव फाउंडेशनने नवे व्यासपीठ देण्याचे ठरविले आहे.

World Men's Day: 'App' with men, 'Real' new platform for complaints | जागतिक पुरुष दिन : ‘अ‍ॅप’ देणार पुरुषांची साथ, तक्रारींसाठी ‘वास्तव’चे नवे व्यासपीठ

जागतिक पुरुष दिन : ‘अ‍ॅप’ देणार पुरुषांची साथ, तक्रारींसाठी ‘वास्तव’चे नवे व्यासपीठ

googlenewsNext

मुंबई : महिलांप्रमाणेच पुरुषांच्या न्याय्य हक्कांसाठी काम करणाºया अनेक संघटना आहेत. मात्र पुरुषांच्या हक्कांसाठी लढणा-या संघटना फारच तुरळक आहेत. त्यामुळे आता १९ नोव्हेंबर, जागतिक पुरुष दिनाच्या निमित्ताने पुरुषांच्या हक्कांसाठी काम करणा-या वास्तव फाउंडेशनने नवे व्यासपीठ देण्याचे ठरविले आहे. या दिनाच्या निमित्ताने पुरुषांच्या तक्रारींसाठी लवकरच ‘अ‍ॅप’चे व्यासपीठ उपलब्ध करून देणार आहेत. या माध्यमातून समाजाच्या मुख्य प्रवाहात पुरुषांच्या हक्कांविषयी जनजागृती करण्यात येणार आहे.
गेली अनेक वर्षे ‘वास्तव फाउंडेशन’ पुरुषांच्या न्याय्य हक्कांसाठी कार्यरत आहे. शिवाय, आपल्या हेल्पलाइनच्या माध्यमातूनही अनेक पुरुषांना हे फाउंडेशन मदत करत असते. आता डिजिटल युगात या पीडित पुरुषांच्या मदतीसाठी फाउंडेशनचे नवे अ‍ॅप्लिकेशन भेटीस येणार आहे. मुंबईत रविवारी तीन ठिकाणी या फाउंडेशनतर्फे बैठकीचे आयोजन केले जाते. त्यात अनेक पुरुष
आपली गाºहाणी मांडण्यासाठी आवर्जून हजेरी लावतात.
पुुरुषांसाठी उपलब्ध करून देण्यात येणाºया नव्या अ‍ॅप्लिकेशनचे मुख्य वैशिष्ट्य म्हणजे, बºयाचदा फसवणुकीची, छळवणुकीची प्रकरणे न्यायालयात पोहोचतात. त्या वेळेस न्यायालयात पुरुषांच्या बाजूने उभे राहण्यास कुणी नसते. अशा वेळी त्यांच्या बाजूने उभे राहण्यासाठी फाउंडेशनच्या अन्य सदस्यांनी मदत करावी यासाठी अ‍ॅपमध्ये वेगळे कॅलेंडर देण्यात येणार आहे. यात पीडित पुरुषांच्या न्यायालयीन प्रक्रियेची तारीख, वेळ, ठिकाण लिहिण्यात येईल.
जेणेकरून, हे पाहून त्या-त्या परिसरातील अन्य सदस्य ‘त्या’ पुरुषाच्या मदतीसाठी, त्याला मानसिक आधार देण्यासाठी न्यायालयात उपस्थित राहू शकतील, अशी माहिती ‘वास्तव’चे संस्थापक अमित देशपांडे यांनी दिली.

स्वाक्षरी मोहीम राबविणार
जागतिक पुरुष दिनाच्या निमित्ताने फाउंडेशनतर्फे रक्तदान शिबिर आणि स्वाक्षरी मोहीम राबविण्यात येणार आहे. रविवार १९ नोव्हेंबर रोजी सकाळी ११ ते दुपारी ३ या वेळेत के. बी. भाभा रुग्णालय, वांद्रे येथे हे शिबिर आयोजित करण्यात येईल. स्वाक्षरी मोहिमेच्या माध्यमातून या फाउंडेशनच्या पुरुषांबाबतच्या विविध प्रलंबित मागण्यांकडे यंत्रणांचे लक्ष वेधून घेण्यात येणार आहे.

‘सेव्ह इंडियन फॅमिली’ या राष्ट्रीय स्वयंसेवी संस्थेच्या साहाय्याने वास्तव फाउंडेशनअंतर्गत हेल्पलाइनद्वारे मदत करण्यात येते.
-: हेल्पलाइन क्रमांक :-
८४२४०२६४९८, ८४२४०२७४९८, ८४२४०२८४९८, ८४२४०२९४९८, ८४२४०३०४९८

Web Title: World Men's Day: 'App' with men, 'Real' new platform for complaints

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Mumbaiमुंबई