आज मतदान!

By Admin | Published: January 27, 2015 11:14 PM2015-01-27T23:14:51+5:302015-01-27T23:14:51+5:30

पालघर जिल्हापरिषदेच्या ५७ गट व त्याअनुषंगाने येणाऱ्या ८ पंचायत समित्यांच्या ११४ गणासाठी बुधवारी मतदान होणार आहे

Voting today! | आज मतदान!

आज मतदान!

googlenewsNext

पालघर : पालघर जिल्हापरिषदेच्या ५७ गट व त्याअनुषंगाने येणाऱ्या ८ पंचायत समित्यांच्या ११४ गणासाठी बुधवारी मतदान होणार आहे. या मतदानाच्या प्रक्रियेसाठी जिल्हा प्रशासन सज्ज झाले आहे. मतदानाच्या सामुग्रीचे वाटप पूर्ण झाले असून ९ लाख ७३ हजार १९५ मतदार मतदानाचा हक्क बजावणार आहेत.
मतदान प्रक्रियेसाठी १६०८ मतदान केंद्रे उभारण्यात आली आहेत. या मतदान केंद्रावर १७३९ मतदान केंद्राध्यक्ष व ५३०६ मतदान अधिकारी व १७६९ इतर कर्मचारी यांची नेमणूक करण्यात आली आहे. तसेच २२८ झोनल अधिकारी ही नियुक्त करण्यात आले आहेत.
जि. प. च्या ५७ गटासाठी २४५ उमेदवार रिंगणात असून पंचायत समितीच्या ११४ गणासाठी ४८० उमेदवार असे एकूण ७२५ उमेदवार निवडणूक रिंगणात आपले भविष्य अजमावत आहेत. या निवडणुकीत ४ लाख ७४ हजार ३३० महिला तर ४ लाख ९८ हजार ८८४ पुरूष असे एकूण ९ लाख ७३ हजार १९५ मतदार उद्या मतदान करणार आहेत. जि. प. च्या ५७ गटापैकी ३४ जागा अनुसूचित जमातीसाठी राखीव ठेवण्यात आले असून १५ जागा मागासप्रवर्ग तर बोईसर जवळील पास्थळ हा गट मात्र अनुसूचित जातीच्या महिलेसाठी राखीव ठेवण्यात आला आहे.
तर सर्वसाधारण उमेदवारासाठी फक्त ७ जागा खुल्या ठेवण्यात आलेल्या आहेत. जि प. मधील ५७ गटापैकी पालघर तालुक्यात १७ गट, डहाणू तालुक्यात ६ गट, विक्रमगड, जव्हार, तलासरी व वाड्यात अनुक्रमे ५ गट वसईमध्ये ४ गट तर मोखाडा मध्ये ३ गट अशी विभागणी करण्यात आली आहे. पालघर जिल्हयातील मतदान प्रक्रियेसाठी १९० बसेस, २४ मिनी बसेस, २३२ जिप, ४ टेम्पो, ३ बोटी, ५४ सहा आसनी रिक्षा तर ही निवडणूक प्रक्रियेत कायदा सुव्यवस्था अबाधीत राहावी यासाठी पोलीस अधिक्षकांच्या नियंत्रणाखाली ६ उपविभागीय पोलीस अधिकारी १०० पो. नि. सहा. पो. नि. व उप . पो. नि. २१४५ पोलीस, २ दंगल नियंत्रण गाड्या, राज्य राखीव दल, नियुक्त करण्यात आले आहे. सर्वच राजकीय पक्षांनी निवडणुकीत हिरीरीने सहभाग घेतल्याने ती चुरशीची होणार आहे.

Web Title: Voting today!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.