कबुतरखान्याच्या दुरुस्तीस एक कोटी

By admin | Published: December 22, 2014 02:40 AM2014-12-22T02:40:38+5:302014-12-22T02:40:38+5:30

दादर येथील कबुतरखान्याची दुरुस्ती करण्यात येणार आहे. तसा निर्णयच महापालिकेने घेतला आहे. नव्या कबुतरखान्याचा आराखडा तयार

One crores for the cemetery repair | कबुतरखान्याच्या दुरुस्तीस एक कोटी

कबुतरखान्याच्या दुरुस्तीस एक कोटी

Next

मुंबई : दादर येथील कबुतरखान्याची दुरुस्ती करण्यात येणार आहे. तसा निर्णयच महापालिकेने घेतला आहे. नव्या कबुतरखान्याचा आराखडा तयार करण्याचे काम सुरू असून, नव्या कामासाठी एक कोटी रुपये खर्च करण्यात येणार आहेत.
कबुतरखान्यात कबुतरांचे उन्ह, पावसापासून रक्षण व्हावे म्हणून येथे काचेचे छत बसवले जाणार आहे. यापूर्वी येथील वाहतूक कोंडी सुटावी म्हणून कबुतरखान्याचा आकार कमी करून तो एकमजली करण्याबाबत पालिकेने निर्णय घेतला होता, परंतु याला स्थानिकांनी विरोध दर्शविला. यासंबधीचा प्रस्ताव पडून होता. आता पालिकेने हा प्रस्ताव पुन्हा मांडला आहे. शिवाय येथील वाहतूक कोंडी सुटावी म्हणून दुभाजकाचा आकार कमी करण्याचा पालिका विचार करत आहे. दरम्यान, कबुतरखान्याच्या रेलिंगची दुरुस्ती, कारंज्याची दुरुस्ती, कबुतरखान्यावर काचेचे छत आणि दवाखाना व प्रजननाच्या जागेची दुरुस्तीचा समावेश आहे. (प्रतिनिधी)

Web Title: One crores for the cemetery repair

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.