मुंबईतील झोपडपट्ट्या कचरामुक्त होईना; निविदा मागवूनही कंत्राटदाराचा प्रतिसाद नाही

By ऑनलाइन लोकमत | Published: March 29, 2024 10:45 AM2024-03-29T10:45:06+5:302024-03-29T10:45:51+5:30

झोपडपट्टी कचरामुक्त करण्यासाठी पालिकेला कंत्राटदार मिळालेला नाही.

mumbai slums will not be litter free there is no response from the contractor despite calling for tenders | मुंबईतील झोपडपट्ट्या कचरामुक्त होईना; निविदा मागवूनही कंत्राटदाराचा प्रतिसाद नाही

मुंबईतील झोपडपट्ट्या कचरामुक्त होईना; निविदा मागवूनही कंत्राटदाराचा प्रतिसाद नाही

मुंबई : झोपडपट्टी कचरामुक्त करण्यासाठी पालिकेला कंत्राटदार मिळालेला नाही. मुंबई स्वच्छतेसाठी एकाच कंत्राटदाराची निवड करण्याचा निर्णय मुंबई महापालिकेने घेतला असला तरी तिसऱ्यांदा निविदा मागवूनही अजून कोणत्याही कंत्राटदाराने प्रतिसाद दिलेला नाही. या कामासाठी १५ फेब्रुवारी रोजी जागतिक स्तरावर निविदा काढण्यात आली होती. 

मात्र, निविदा प्रक्रियेला कंत्राटदारांकडून प्रतिसाद मिळत नसल्याने पुन्हा निविदा काढण्यात आली होती. दुसऱ्या निविदेनंतर तिसऱ्यांदा काढण्यात आलेल्या निविदेला १ एप्रिलपर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. पंधराशे कोटींच्या या कामासाठी निविदा मागवण्यात आली आहे. मुंबई शहरात ६० टक्के मुंबईकर झोपडपट्टीत वास्तव्य करतात. झोपडपट्टीमधील स्वच्छता हा कळीचा प्रश्न बनला आहे. त्यामुळे झोपडपट्टी कचरामुक्त करण्यासाठी स्वतंत्र धोरण राबवण्याचा निर्णय पालिकेने घेतला आहे

अशी असेल जबाबदारी-

या कामांतर्गत झोपडपट्टी भागातील कचरा संकलन, वर्गीकरण आणि डंपिंग ग्राऊंडपर्यंत कचरा पोहोचवण्याची जबाबदारी एकाच कंत्राटदारावर सोपवण्यात येईल.

झोपडपट्टीतील गल्ल्यांची सफाई तसेच छोट्या गटारांच्या सफाईसाठीही
स्वतंत्र कंत्राटदार नेमण्यात येईल. झोपडपट्ट्यांमधील स्वच्छतागृहांच्या
सफाईची जबाबदारी स्वतंत्र कंत्राटदारावर असेल, दिवसातून दोन ते तीन वेळा या स्वच्छतागृहांची स्वच्छता करावी लागेल.

तिसऱ्यांदा निविदा; १ एप्रिलपर्यंत मुदतवाढ -

पालिकेच्या धोरणानुसार विशेषतः झोपडपट्टीतील कचरा संकलन, त्याचे वर्गीकरण आणि डंपिंग ग्राऊंडपर्यंत कचरा पोहोचवण्याची जबाबदारी कंत्राटदारांवर सोपवण्यात येणार आहे. यासाठी १५ फेब्रुवारी रोजी निविदा मागवण्यात आल्या. परंतु प्रतिसाद न मिळाल्याने एक आठवड्याची मुदतवाढ दिली. 

त्यावेळीही प्रतिसाद न मिळाल्याने १८ मार्चपर्यंत पुन्हा मुदतवाढ दिली. मात्र, कोणी कंत्राटदार पुढे न आल्याने २५ मार्चपर्यंत पुन्हा एकदा मुदतवाढ दिली. त्यानंतर आता १ एप्रिलपर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे.

Web Title: mumbai slums will not be litter free there is no response from the contractor despite calling for tenders

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.