रवींद्र वायकरांच्या क्षेत्रात अमोल कीर्तिकरांचा मेळावा संपन्न

By मनोहर कुंभेजकर | Published: April 29, 2024 03:21 PM2024-04-29T15:21:57+5:302024-04-29T15:23:50+5:30

Maharashtra lok sabha election 2024 : उद्धव सेनेचे उत्तर पश्चिम लोकसभा क्षेत्राचे उमेदवार अमोल कीर्तिकर यांची प्रचार सभा काल जोगेश्वरी पूर्व शिवसेना शाखा क्र ७७ यांच्यावतीने आयोजित केली होती

Maharashtra lok sabha election 2024 melava of Amol Kirtikar in the area of ravindra Vaikars | रवींद्र वायकरांच्या क्षेत्रात अमोल कीर्तिकरांचा मेळावा संपन्न

रवींद्र वायकरांच्या क्षेत्रात अमोल कीर्तिकरांचा मेळावा संपन्न

मुंबई - उद्धव सेनेचे उत्तर पश्चिम लोकसभा क्षेत्राचे उमेदवार अमोल कीर्तिकर यांची प्रचार सभा काल जोगेश्वरी पूर्व शिवसेना शाखा क्र ७७ यांच्यावतीने आयोजित केली होती. या मतदार संघात कीर्तिकर विरुद्ध  शिंदे सेनेचे येथील स्थानिक आमदार रवींद्र वायकर अशी लढत होण्याची शक्यता आहे.

यावेळी जोगेश्वरी विधानसभा संघटक  विश्वनाथ सावंत, माजी नगरसेवक  अनंत (बाळा) नर व अन्य सहकारी पदाधिकारी उपस्थित होते. सुमारे 300 हुन अधिक शिवसैनिकांची आणि विशेष म्हणजे जेष्ठ शिवसैनिक यावेळी आवर्जून उपस्थित होते. यावेळी अमोल कीर्तिकर यांनी उपस्थित पदाधिकारी, गटप्रमुख व कार्यकर्ता यांच्या सभेला उपस्थित राहून संवाद साधला. 

येथील आमदार शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) यांना सोडून दुसऱ्या पक्षात गेले तरीही येथील जनता व शिवसेनेचे सर्व पदाधिकारी हे उद्धव ठाकरे यांच्या सोबत ठामपणे उभे आहेत. यामुळे येणाऱ्या लोकसभा विधानसभा निवडणुकीत जोगेश्वरी विधानसभेतून अमोल कीर्तीकर यांना भरघोस मताधिक्य मिळेल अशी ग्वाही मान्यवरांनी दिली.तसेच सर्व पदाधिकारी, शिवसैनिक व कार्यकर्त्यांनी एकजुटीने धगधगती मशाल २० मे पर्यंत अशीच पेटत ठेवाण्याचा निर्धार या बैठकीत केला. 
 

Web Title: Maharashtra lok sabha election 2024 melava of Amol Kirtikar in the area of ravindra Vaikars

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.