भारतीय वाचकांना ‘परदेशी’ लेखकांची भुरळ

By admin | Published: December 1, 2015 01:57 AM2015-12-01T01:57:17+5:302015-12-01T01:57:17+5:30

भारतीय वाचनसंस्कृतीचा आढावा घेण्यासाठी केलेल्या सर्वेक्षणात ५५.२८ टक्के भारतीय वाचकांना ‘परदेशी’ लेखकांची भुरळ असल्याचे निष्पन्न झाले आहे. तर केवळ, ४४.२८ टक्के वाचक

Indian readers' love of 'foreign' writers | भारतीय वाचकांना ‘परदेशी’ लेखकांची भुरळ

भारतीय वाचकांना ‘परदेशी’ लेखकांची भुरळ

Next

मुंबई : भारतीय वाचनसंस्कृतीचा आढावा घेण्यासाठी केलेल्या सर्वेक्षणात ५५.२८ टक्के भारतीय वाचकांना ‘परदेशी’ लेखकांची भुरळ असल्याचे निष्पन्न झाले आहे. तर केवळ, ४४.२८ टक्के वाचक भारतीय लेखकांचे साहित्य वाचतात असे म्हटले आहे. या वाचकांपैकी, ७८ टक्के पुरुष आणि २२ टक्के स्त्रियांनी भारतीय लेखकांना पसंती दर्शविली आहे.
भारतीय वाचकांचा प्राधान्यक्रम, सवयी जाणून घेण्यासाठी टाटा लिटरेचर लाईव्हने नुकतेच
एक सर्वेक्षण केले. या सर्वेक्षणात
२ हजार ४१४ साहित्यप्रेमींकडून आलेल्या प्रतिसादाच्या माध्यमातून
हे सर्वेक्षण अंतिम टप्प्यात आले.
या सर्वेक्षणानुसार, इंटरनेटचा वापर करणाऱ्या भारतीयांची संख्या जगात तिसऱ्या क्रमांकावर असली तरी, प्रसिद्ध पुस्तकांबाबत आॅनलाईन आवृत्तीऐवजी प्रत्यक्ष पुस्तक वाचण्याला वाचकांचे प्राधान्य असते, हे दिसून आले. तर ८२.८२ टक्के वाचकांनी ई-बुक्स ऐवजी छापील पुस्तकाला प्राधान्य देत असल्याचे सांगितले आहे.
साहित्य विश्वातील नानाविध साहित्य प्रकारांपैकी वाचकांच्या मनावर कोणते अधिराज्य गाजविते याविषयी वाचकांना विचारले
असता, यात कांदबऱ्यांनी प्रथम स्थान मिळवले असून तब्बल ६२.६५ टक्के वाचकांनी कादंबऱ्या आवडत असल्याचे म्हटले आहे. त्यानंतर लघुकथा२८.२६ टक्के, निबंध ४.७२ टक्के, कविता २.८४ टक्के आणि नाटक १.५४ टक्के यांचा समावेश आहे.

वाचनासाठी बिछाना, चहाला पसंती...
या सर्वेक्षणानुसार, ८१.०२ टक्के वाचकांनी सांगितले आहे की, बिछाना किंवा कोच हे पुस्तक वाचनासाठी सर्वात आवडते ठिकाण आहे. तर वाचनासोबत चहा आणि कॉफी सर्वात चांगले साथीदार आहेत. त्यांना ४७.३४ टक्के वाचकांनी पसंती दर्शविली असून यात शेंगदाणे, काजू, स्नॅक्स या गोष्टींना ३१.३२ मागे टाकले आहे. शिवाय, वाचताना गाणी ऐकणे १५.६१ टक्के तर वाईनचे सेवन करणे ५.७३ टक्के वाचकांना आवडते असे निरीक्षण सर्व्हेक्षणात मांडले आहे.

महिला वाचक ‘शेअरलॉक’च्या प्रेमात!
साहित्यातील आवडते पात्र म्हणून भारतीय वाचकांनी जगप्रसिद्ध गुप्तहेर ‘शेअरलॉक होम्स’ची निवड केली आहे. मुख्य म्हणजे, हा गुप्तहेर म्हणजे सर्वात आवडते काल्पनिक पात्र असल्याची प्रतिक्रिया ३८.४६ टक्के वाचकांनी दिली आहे. तर ५३.१४ टक्के महिला वाचकांनी होम्सला भेटण्याची इच्छा व्यक्त केली आहे. त्यानंतर ‘गॉन विथ द वाईण्ड’च्या ऱ्हेट बटलर २१.९९ चा क्रम लागतो. याशिवाय, काल्पनिक चरित्रांपैकी ‘प्राईड अँड प्रिज्युडीस’च्या इलिझाबेथ बॅनेटला सर्वाधिक भेटण्याची इच्छा असल्याचे ३०.९७ टक्के पुरुषांनी म्हटले आहे.

Web Title: Indian readers' love of 'foreign' writers

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.