अमोल कीर्तिकर यांच्या निवडणूक कार्यालयाचे उदघाटन

By मनोहर कुंभेजकर | Published: April 26, 2024 01:31 PM2024-04-26T13:31:59+5:302024-04-26T13:33:47+5:30

अमोल कीर्तिकर यांची उमेदवारी दि,9 मार्च रोजी शाखांच्या भेटी दरम्यान जाहिर केली होती.

inauguration of election office of amol kirtikar in mumbai mla sunil prabhu and shiv sen deputy leader rajya sabha mp priyanka gandhi were present | अमोल कीर्तिकर यांच्या निवडणूक कार्यालयाचे उदघाटन

अमोल कीर्तिकर यांच्या निवडणूक कार्यालयाचे उदघाटन

मनोहर कुंभेजकर, मुंबई :  अमोल कीर्तिकर यांची उमेदवारी दि,9 मार्च रोजी शाखा शाखांच्या भेटी दरम्यान जाहिर केली होती. मुंबई उत्तर पश्चिम लोकसभा मतदारसंघ महाविकासआघाडीचे उमेदवार कीर्तिकर यांच्या गोरेगाव पश्चिम,एस.व्ही.रोड येथील गोरेगाव विधानसभा निवडणूक मध्यवर्ती कार्यालयाचे उद्घाटन शिवसेना नेते, विभागप्रमुख, आमदार सुनिल प्रभू यांच्या शुभहस्ते शिवसेना उपनेत्या राज्यसभा खासदार प्रियंका चतुर्वेदी  व समाजवादी गणराज्य पार्टीचे अध्यक्ष आमदार कपिल पाटील,महिला विभाग संघटक साधना माने यांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आले. 

यावेळी अमोल कीर्तिकर यांनी उपस्थितीत पदाधिकाऱ्यांशी व सहकाऱ्यांशी संवाद साधला. महाविकास - इंडिया आघाडीचे मान्यवर नेते व गोरेगाव विधानसभेचे सर्व पदाधिकारी  व शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

अमोल कीर्तिकर यांची उमेदवारी जाहीर झाल्याबरोबरच उत्तर पश्चिम मुंबई लोकसभा समन्वयक पदी शिवसेना आमदार विलास पोतनीस यांची नियुक्ती झाली.त्यानंतर त्यांनी शिवसेना नेते सुभाष देसाई, तसेच शिवसेना नेते ,विभागप्रमुख अँड.अनिल परब,शिवसेना नेते,आमदार  सुनील प्रभू ,यांच्या साथीने विभागवार शिवसेना पदाधिकाऱ्यांच्या बैठकी घेतल्या. तसेच प्रत्येक शाखा शाखा मध्ये जाऊन उपशाखाप्रमुख व  शिवसैनिकां सोबत संवाद साधून  घरोघरी जावून प्रचार करण्याचे आवाहन केले. 

त्यानंतर उत्तर पश्चिम लोकसभा मतदारसंघातील दिंडोशी, गोरेगाव, जोगेश्वरी (पूर्व),अंधेरी, वर्सोवा, अंधेरी (पूर्व) या सर्व विधानसभा मतदारसंघातील शिवसैनिकांनी खास करून शिवसेनेच्या महिला रणरागिनींनी  प्रचारात स्वतःला झोकून दिल्याची माहिती पोतनीस यांनी दिली.

Web Title: inauguration of election office of amol kirtikar in mumbai mla sunil prabhu and shiv sen deputy leader rajya sabha mp priyanka gandhi were present

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.