पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर आपदा मित्र पुन्हा ‘इन ॲक्शन’, आपत्कालीन परिस्थितीत करणार मदत

By ऑनलाइन लोकमत | Published: April 22, 2024 11:22 AM2024-04-22T11:22:36+5:302024-04-22T11:24:56+5:30

मे महिन्यात प्रशिक्षण.

in the wake of monsoon one thousand disaster management volunteers of bmc are getting ready to control emergency situations in mumbai | पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर आपदा मित्र पुन्हा ‘इन ॲक्शन’, आपत्कालीन परिस्थितीत करणार मदत

पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर आपदा मित्र पुन्हा ‘इन ॲक्शन’, आपत्कालीन परिस्थितीत करणार मदत

मुंबई : कोणत्याही आपत्तीच्या काळात मदत कार्यासाठी तत्पर असणारे मुंबई पालिकेचे एक हजार आपदा मित्र पावसाळ्यासाठी सज्ज होत आहेत. कुठे दरड कोसळली, पूरसदृश परिस्थिती निर्माण झाल्यास अथवा समुद्र किनाऱ्यावर दुर्घटना घडल्यास अशावेळी तत्काळ वॉर्डनिहाय तैनात असलेले पालिकेचे आपदा मित्र लागलीच घटनास्थळी धाव घेत मदतकार्य करतात. 

पावसाळ्याच्या तोंडावर त्यांना मे महिन्यात नव्याने प्रशिक्षण देण्यात येणार असून, आवश्यकतेनुसार वॉर्डनिहाय त्यांची नियुक्ती करण्यात येणार आहे. केंद्र व राज्य शासनाच्या निर्देशांनुसार विविध आपत्कालीन परिस्थितीत नागरिकांना प्राथमिक आपत्ती व्यवस्थापन करता यावे, यासाठी प्रात्यक्षिकांसह धडे देण्यासाठी मुंबई महापालिकेने ‘आपदा मित्र’ हा उपक्रम हाती घेतला आहे. पालिकेकडून आतापर्यंत एक हजार स्वयंसेवकांना ‘आपदा मित्र’  म्हणून प्रशिक्षण दिले आहे.

मे महिन्याच्या अखेरीस हाेणार रेकीची तयारी सुरू -

१) पावसाळ्यात दरड कोसळणे, मोडकळीस आलेल्या धोकादायक इमारतींचा जीर्ण भाग पडणे, अशा घटना घडत असल्याने अशाप्रसंगी विविध यंत्रणा सज्ज आहेत की नाही, याची रेकी पालिकेच्या आपत्ती व्यवस्थापन विभागाकडून मे महिन्याच्या अखेरपर्यंत करण्यात येणार आहे. 

२) एनडीआरएफ, मुंबई अग्निशमन दल, नौदल, वाहतूक पोलिस या यंत्रणाही या रेकीमध्ये सहभाग घेणार आहेत.

...असे दिले जाते प्रशिक्षण

१)  विविध प्रकारच्या आपत्तींनुसार द्यावयाचे प्रथमोपचार, हृदयविकाराचा झटका आल्यास द्यावयाचा ‘सीपीआर’ अर्थात कार्डिओ पल्मनरी रिससिटेशन म्हणजेच हृदयाचे पुनरुज्जीवन करणे, त्याचबरोबर पूरपरिस्थितीत बचाव व शोध कार्य करणे यांसारख्या विविध बाबींचा समावेश असलेले प्रशिक्षण त्यांना देण्यात येणार आहे. 

२) आग किंवा विविध स्वरूपाच्या दुर्घटना घडू नयेत, यासाठी घ्यावयाची खबरदारी; एखादी दुर्घटना घडल्यास त्यावेळी स्वतःची काळजी घेत करावयाचे मदतकार्य याबाबतही अनुभवी व तज्ज्ञांद्वारे प्रशिक्षण दिले जाणार आहे. प्रशिक्षण पूर्ण करणाऱ्या युवतींना ‘आपदा सखी’; तर युवकांना ‘आपदा मित्र’ म्हणून ओळखपत्र व प्रमाणपत्र देण्यात येते. त्याचबरोबर आपत्कालीन परिस्थितीत उपयोगी पडू शकतील, अशा विविध वस्तूंचा एक संचदेखील या सर्व प्रशिक्षणार्थींना दिला जातो.

Web Title: in the wake of monsoon one thousand disaster management volunteers of bmc are getting ready to control emergency situations in mumbai

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.