सीएसएमटी स्टेशनच्या प्लॅटफॉर्मवर सोलापूर एक्सप्रेसच्या डब्याला आग

By ऑनलाइन लोकमत | Published: May 29, 2018 03:50 PM2018-05-29T15:50:09+5:302018-05-29T16:28:52+5:30

सीएसएमटी रेल्वे स्टेशनच्या प्लॅटफॉर्मवर क्रमांक 18वर एक्सप्रेसच्या रिकाम्या डब्याला आग लागल्यानं एकच खळबळ उडाली आहे.

A fire at the express coach on the platform of the CSMT station | सीएसएमटी स्टेशनच्या प्लॅटफॉर्मवर सोलापूर एक्सप्रेसच्या डब्याला आग

सीएसएमटी स्टेशनच्या प्लॅटफॉर्मवर सोलापूर एक्सप्रेसच्या डब्याला आग

Next

मुंबई-  सीएसएमटी रेल्वे स्टेशनच्या प्लॅटफॉर्मवर क्रमांक 18वर सोलापूर एक्सप्रेसच्या रिकामी डब्याला आग लागल्यानं एकच खळबळ उडाली आहे. अग्निशमन दलाच्या चार गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या आणि आगीवर नियंत्रण मिळविण्यात आले.  दरम्यान, लांबपल्ल्याच्या गाड्या उभ्या असलेल्या यार्डात सोलापूर एक्स्प्रेसच्या डब्याला आग लागल्यानं फलाटावरील प्रवाशांमध्ये एकच तारांबळ उडाली. सुदैवानं या आगीत कोणतीही जीवितहानी झालेली नाही. परंतु आगीचे कारण अद्याप अस्पष्टच आहे. आगीवर नियंत्रण मिळवण्यात यश आले आहे. आगीमुळे एकाच बोगीचे नुकसान झाले. यार्डसारख्या भागात प्रत्येक ठिकाणी सुरक्षा पुरवणे शक्य नाही तरी देखील अग्निशमन दलाने चांगली कामगिरी करत तात्काळ आगीवर नियंत्रण मिळवले, अशी माहिती मध्य रेल्वेचे महाव्यवस्थापक डी. के. शर्मा यांनी दिली आहे.




Web Title: A fire at the express coach on the platform of the CSMT station

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.