डोंगरीकर फोडणार भाल्याने दहीहंडी

By admin | Published: September 5, 2015 02:14 AM2015-09-05T02:14:08+5:302015-09-05T02:14:08+5:30

मानवी मनोरे रचून दहीहंडी फोडण्याची प्रथा सर्वश्रुत आहे. मात्र वेसावे कोळीवाड्यातील डोंगरी गल्लीत लांब लाकडी काठीला अणुकुचीदार भाला बांधून दहीहंडी फोडण्याची प्रथा परंपरेपासून सुरू आहे.

Dahi Handi by the price of the mountain will break | डोंगरीकर फोडणार भाल्याने दहीहंडी

डोंगरीकर फोडणार भाल्याने दहीहंडी

Next

मनोहर कुंभेजकर, वेसावे
मानवी मनोरे रचून दहीहंडी फोडण्याची प्रथा सर्वश्रुत आहे. मात्र वेसावे कोळीवाड्यातील डोंगरी गल्लीत लांब लाकडी काठीला अणुकुचीदार भाला बांधून दहीहंडी फोडण्याची प्रथा परंपरेपासून सुरू आहे.
येथील सुमारे ५००० स्त्री-पुरूष आणि लहान मुलांसाठी सुमारे ५ लाख रुपये खर्चून पिवळ्या रंगाचा खास पेहराव तयार करण्यात आल्याची माहिती डोंगरीकर तरुण मंडळाचे अध्यक्ष महेंद्र लडगे यांनी दिली. ते म्हणाले, दहीहंडी उत्सवासाठी सुमारे २० लाख खर्च अपेक्षित आहे. शनिवारी सायंकाळी ७ वाजल्यापासून श्री कृष्ण जन्माष्टमीनिमित वेसावे गावातून डोंगरीकर तरुण मंडळ भव्य मिरवणूक काढणार आहेत. तर रविवारी सकाळी आठच्या सुमारास येथील दहीहंडी उत्सवात संपूर्ण वेसावे गाव सामील होईल. वेसावा कोळी जमात ट्रस्टच्या माध्यमातून येथील श्रीराम मंदिरात कृष्ण जन्माष्टमी आणि दहीहंडीचा उत्सव मोठ्या दणक्यात साजरा केला जातो. त्याअनुषंगाने ८ गल्ल्यांना हा उत्सव व हंडी फोडण्याचा दर नऊ वषार्नी मान मिळतो. यंदा हा मान डोंगरी गल्लीला मिळाला आहे. वेसावे गावातील सर्व मानाच्या हंड्या अणुकुचीदार भाल्याच्या सहाय्याने फोडल्या जातात.
प्रभादेवीतील सह्याद्री प्रतिष्ठानने दुष्काळग्रस्तांच्या मदतीसाठी दहीहंडीचे आयोजन केले आहे. गोविंदा पथकांना यावेळी जितकी रक्कम देण्यात येईल, तितकीच रक्कम दुष्काळग्रस्तांसाठी मुख्यमंत्री निधीला देणार आहेत.

मांडवी जपणार चित्ररथाची परंपरा!
मांडवी येथील श्री पिंपळेश्वर सार्वजनिक दहिकाला उत्सव समितीने पारंपरिक पद्धतीने चित्ररथाद्वारे विषय मांडून गोविंदाचे आयोजन केले आहे. यंदाच्या चित्ररथात शिवसेनेच्या सुवर्णमहोत्सवाचा देखावा साकारला आहे. त्यातून शिवसेनेची स्थापना, भारतीय कामगार सेना, स्थानिय लोकाधिकार समिती, सामना, विधानभवनावर भगवा, युवासेना अशी सेनेची वाटचाल रेखाटण्यात आली आहे.

कांद्याला मानाचे स्थान
दादर प्श्चिम शिवसेना शाखा क्रमांक १८४ चे शाखाप्रमुख यशवंत विचले यांच्यातर्फे १ लाख ११ हजार १११ रुपयांचे बक्षीस जाहीर करण्यात आले आहे. सहा थरांपर्यंत मनोरे रचणाऱ्या पथकाला सन्मानचिन्ह व १ किलो कांदा, तर महिला गोविंदा पथकास ५,५५५ रुपये व २ किलो कांदे बक्षीसरूपात देण्यात येणार आहेत.

Web Title: Dahi Handi by the price of the mountain will break

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.