धक्कादायक! खेळता खेळता बेपत्ता झाले; सख्खे बहीण-भाऊ कारमध्ये मृतावस्थेत सापडले

By ऑनलाइन लोकमत | Published: April 25, 2024 03:12 PM2024-04-25T15:12:24+5:302024-04-25T15:16:29+5:30

मुंबईतील अँटॉप हिल परिसरात धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. एका निर्जनस्थळी बंद पडलेल्या कारमध्ये दोन चिमुकल्यांचे मृतदेह आढळून आले आहेत.

Bodies Of Two Missing Children Found Inside Car In Antop Hill | धक्कादायक! खेळता खेळता बेपत्ता झाले; सख्खे बहीण-भाऊ कारमध्ये मृतावस्थेत सापडले

धक्कादायक! खेळता खेळता बेपत्ता झाले; सख्खे बहीण-भाऊ कारमध्ये मृतावस्थेत सापडले

मुंबई-

मुंबईतील अँटॉप हिल परिसरात धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. एका निर्जनस्थळी बंद पडलेल्या कारमध्ये दोन चिमुकल्यांचे मृतदेह आढळून आले आहेत. सख्ख्या बहिण-भावाच्या मृत्यूमुळे अँटॉप हिल परिसरात खळबळ उडाली. कारमध्ये अडकून पडल्याने श्वास गुदमरुन दोघांचा मृत्यू झालाचा प्राथमिक अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे. 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, साजिद मोहम्मद शेख (७), मुस्कान शेख (५) हे दोघंही बुधवारी दुपारपासून बेपत्ता होते. त्यांच्या कुटुंबीयांनी दोघांना शोधण्याचा खूप प्रयत्न केला मात्र त्यांचा शोध लागला नाही. अखेर संध्याकाळी पालकांनी अँटॉप हिल पोलीस ठाण्यात धाव घेतली. पोलिसांनी परिसर पिंजून काढला असता रात्रीच्या सुमारात घरापासून अवघ्या ५० मीटरवर उभ्या असलेल्या एका भंगारातील कारमध्ये दोघं बेशुद्ध अवस्थेत आढळून आले. 

दोघांनाही तातडीनं सायन रुग्णालयात नेण्यात आलं. पण तोवर बराच उशीर झाला होता. डॉक्टरांनी दोघांनाही मृत घोषीत केलं. मुलं खेळता खेळता कारमध्ये बसली आणि कार लॉक झाल्याने दोघांचा गुदमरुन मृत्यू झाला असावा असा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे. सदर परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासले जात असून पोलीस या प्रकरणी अधिक तपास करत आहेत. अँटॉप हिल पोलीस ठाण्यात अपघाती मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. 

Web Title: Bodies Of Two Missing Children Found Inside Car In Antop Hill

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.