बूट, शॅम्पू, मॉईश्चरच्या बाटल्यांतून ड्रग्जची तस्करी; २० कोटींच्या कोकेनसह परदेशी महिलेला अटक

By ऑनलाइन लोकमत | Published: March 26, 2024 04:45 PM2024-03-26T16:45:39+5:302024-03-26T16:46:15+5:30

बूट, शॅम्पू आणि मॉईश्चरच्या बाटल्यांमधून ड्रग्जची तस्करी करणाऱ्या महिला प्रवाशाला अटक करण्यात आली.

a foreign woman arrested with cocaine worth 20 crores for drug smuggling through shoes and shampoo moisture bottles in mumbai | बूट, शॅम्पू, मॉईश्चरच्या बाटल्यांतून ड्रग्जची तस्करी; २० कोटींच्या कोकेनसह परदेशी महिलेला अटक

बूट, शॅम्पू, मॉईश्चरच्या बाटल्यांतून ड्रग्जची तस्करी; २० कोटींच्या कोकेनसह परदेशी महिलेला अटक

मुंबई : बूट, शॅम्पू आणि मॉईश्चरच्या बाटल्यांमधून ड्रग्जची तस्करी करणाऱ्या महिला प्रवाशाला अटक करण्यात आली. ही कारवाई मुंबई विमानतळावर केंद्रीय महसूल गुप्तचर यंत्रणेच्या (डीआरआय) अधिकाऱ्यांनी केली. या महिलेकडून १९ कोटी ७९ लाख रुपयांचे कोकेन जप्त केले आहे. महिला सिएरा लिओन देशाची नागरिक आहे.

नैरोबी येथून मुंबईत येणाऱ्या एका विमानाद्वारे अमली पदार्थांची तस्करी होत असल्याची विशिष्ट माहिती डीआरआयच्या अधिकाऱ्यांना मिळाली. त्यानुसार विमान मुंबईत दाखल झाल्यानंतर अधिकाऱ्यांनी सापळा लावला.

न्यायालयीन कोठडी -

१) प्रवाशांपैकी एका महिलेच्या हालचाली संशयास्पद वाटल्याने तिची चौकशी करण्यात आली. त्यावेळी तिच्या बुटांच्या तळव्यात, शॅम्पू, मॉईश्चरच्या बाटतील तिने कोकेन लपविल्याचे आढळून आले.

२) या कारवाईत १,९७९ ग्रॅम कोकेन जप्त करण्यात आले. या प्रकरणी तिला न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली असून पुढील तपास सुरू आहे.

Web Title: a foreign woman arrested with cocaine worth 20 crores for drug smuggling through shoes and shampoo moisture bottles in mumbai

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.