ठाकरेंनी शड्डू ठोकलाच! सांगलीच्या चंद्रहार पाटलांसह १७ उमेदवारांची पहिली यादी जाहीर

By ऑनलाइन लोकमत | Published: March 27, 2024 09:24 AM2024-03-27T09:24:01+5:302024-03-27T09:24:36+5:30

संजय राऊत यांनी आपल्या ट्विटरवरून यादी केली प्रसिद्ध

Shiv Sena Uddhav Balasaheb Thackeray faction List of 16 names for candidates for Lok Sabha Election 2024 announced by Sanjay Raut | ठाकरेंनी शड्डू ठोकलाच! सांगलीच्या चंद्रहार पाटलांसह १७ उमेदवारांची पहिली यादी जाहीर

ठाकरेंनी शड्डू ठोकलाच! सांगलीच्या चंद्रहार पाटलांसह १७ उमेदवारांची पहिली यादी जाहीर

Shivsena Uddhav Balasaheb Thackeray, Lok Sabha Election 2024 Candidate List: महाविकास आघाडीतील घटक पक्षांच्या गेल्या महिन्याभरात अनेक बैठका झाल्या. त्या बैठकांमध्ये जागावाटपावर चर्चा होत होती. मात्र सुरुवातीला काही जागांवरून मतभेद होते. त्यानंतर वंचित बहुजन आघाडीला सोबत घ्यायचे की नाही, यावरून बराच काळ चर्चा झाली. अखेर २२-१६-१० अशी जागावाटप ठरल्याचे सांगितले जात होते. पण आज ठाकरे गटाने थेट १७ जणांच्या नावांची यादी जाहीर केली. ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी ही यादी आपल्या ट्विटर अकाऊंटवर पोस्ट केली आणि उमेदवारांची माहिती दिली.

संजय राऊत यांनी आपल्या ट्विटमध्ये लिहिले आहे की, हिंदूहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या आशीर्वादाने आणि शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांच्या आदेशाने शिवसेनेच्या १७ लोकसभा उमेदवारांची यादी जाहीर करण्यास येत आहे. मुंबई दक्षिण मध्य मतदारसंघातून अनिल देसाई यांच्या उमेदवारीची घोषणा करण्यात येत आहे, असे ट्विट त्यांनी केले.

ठाकरे गटाकडून जाहीर झालेले १७ उमेदवार

  1. बुलढाणा - नरेंद्र खेडेकर
  2. यवतमाळ-वाशिम - संजय देशमुख
  3. मावळ - संजोग वाघेरे-पाटील
  4. सांगली - चंद्रहार पाटील
  5. हिंगोली - नागेश पाटील आष्टीकर
  6. छत्रपती संभाजीनगर - चंद्रकांत खैरे
  7. धाराशिव - ओमराजे निंबाळकर
  8. शिर्डी- भाऊसाहेब वाघचौरे
  9. नाशिक - राजाभाई वाजे
  10. रायगड - अनंत गीते
  11. सिंधुदुर्ग-रत्नागिरी - विनायक राऊत
  12. ठाणे - राजन विचारे
  13. मुंबई-ईशान्य - संजय दिना पाटील
  14. मुंबई-दक्षिण - अरविंद सावंत
  15. मुंबई-वायव्य - अमोल कीर्तिकर
  16. परभणी - संजय जाधव
  17. मुंबई दक्षिण मध्य - अनिल देसाई

Web Title: Shiv Sena Uddhav Balasaheb Thackeray faction List of 16 names for candidates for Lok Sabha Election 2024 announced by Sanjay Raut

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.