ना CM शिंदे, ना फडणवीस; अजित पवार गटाच्या स्टार प्रचारकांच्या यादीत महायुतीचे कुणीच नाही!

By ऑनलाइन लोकमत | Published: March 28, 2024 03:12 PM2024-03-28T15:12:56+5:302024-03-28T15:37:22+5:30

ज्यांच्या भाषणाला ऐकण्यासाठी, ज्यांच्या रॅलीमुळे प्रचंड लोक गर्दी करतात अशा व्यक्तींना स्टार प्रचारक म्हटलं जाते.

Loksabha Election 2024: List of star campaigners of NCP Ajit Pawar group announced; CM Eknath Shinde, Devendra Fadnavis was also excluded | ना CM शिंदे, ना फडणवीस; अजित पवार गटाच्या स्टार प्रचारकांच्या यादीत महायुतीचे कुणीच नाही!

ना CM शिंदे, ना फडणवीस; अजित पवार गटाच्या स्टार प्रचारकांच्या यादीत महायुतीचे कुणीच नाही!

मुंबई - NCP Leaders Star Campaigners ( Marathi News )आगामी लोकसभा निवडणुकीसाठी प्रत्येक पक्षाने त्यांच्या स्टार प्रचारकांची यादी जाहीर केली आहे. निवडणुकीच्या काळात स्टार प्रचारकांवर मोठी जबाबदारी असते. उमेदवारांच्या प्रचारार्थ रॅली, सभा घेण्यासाठी स्टार प्रचारकांचा उपयोग होतो. भाजपा-शिवसेना यांच्यानंतर आता उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नेतृत्वातील राष्ट्रवादीनेही स्टार प्रचारकांची यादी जाहीर केली आहे. विशेष म्हणजे भाजपा-शिवसेनेच्या यादीप्रमाणे NCP च्या यादीत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या नावाचा उल्लेख टाळला आहे. 

कोण आहेत स्टार प्रचारक?

  1. अजित पवार
  2. प्रफुल पटेल
  3. सुनील तटकरे
  4. छगन भुजबळ
  5. दिलीप वळसे पाटील
  6. रामराजे नाईक निंबाळकर
  7. धनंजय मुंडे
  8. हसन मुश्रीफ
  9. धर्मरावबाबा आत्रम
  10. अनिल पाटील
  11. नरहरी झिरवळ
  12. संजय बनसोडे
  13. आदिती तटकरे
  14. सुबोध मोहिते
  15. ब्रिजमोहन श्रीवास्तव
  16. के.के शर्मा
  17. सय्यद जलाउद्दिन
  18. बाबा सिद्दिकी
  19. रुपाली चाकणकर
  20. अमोल मिटकरी
  21. सुनील टिंगरे
  22. इंद्रनील नाईक
  23. सुनील शेळके
  24. विक्रम काळे
  25. चेतन तुपे
  26. नितीन पवार
  27. राजेंद्र शिंगणे
  28. दत्तात्रय भरणे
  29. सतीश चव्हाण
  30. उमेश पाटील
  31. समीर भुजबळ
  32. अमरसिंह पंडित
  33. नजीब मुल्ला
  34. सूरज चव्हाण
  35. कल्याण आखाडे
  36. सुनील मगरे
  37. इद्रिस नाईकवडी

 

दरम्यान भाजपाच्या ४० जणांच्या स्टार प्रचारकांच्या यादीत उपमुख्यमंत्री म्हणून अजित पवारांचाही समावेश करण्यात आला आहे. तर शिवसेनेच्या यादीतही अजित पवार आणि प्रफुल पटेल यांच्या नावाचा उल्लेख आहे. 

स्टार प्रचारक म्हणजे काय?

ज्यांच्या भाषणाला ऐकण्यासाठी, ज्यांच्या रॅलीमुळे प्रचंड लोक गर्दी करतात अशा व्यक्तींना स्टार प्रचारक म्हटलं जाते. या स्टार प्रचारकांमुळे त्या पक्षाला मत मिळण्यास फायदा होतो. त्यामुळे निवडणुकीत उभं असणाऱ्या उमेदवारांना वाटते आपल्या प्रचाराला स्टार प्रचारकाने यावे. मात्र त्यांच्या रॅली, सभांवर मोठा खर्च होतो. स्टार प्रचारकाला वेळेअभावी अनेक ठिकाणी सभेला जाण्यास विमान, हेलिकॉप्टरसह अन्य गोष्टी लागतात. त्यामुळे स्टार प्रचारकाचा खर्च हा उमेदवाराच्या निवडणूक खर्चात मोजला जात नाही. हा सर्व खर्च पक्षाकडून होत असतो. त्यामुळे स्टार प्रचारकांच्या यादीत कोणाला संधी द्यायची आणि नाही हा निर्णय त्या पक्षाचा असतो.

Web Title: Loksabha Election 2024: List of star campaigners of NCP Ajit Pawar group announced; CM Eknath Shinde, Devendra Fadnavis was also excluded

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.