चंद्रकांत पाटलांचा उद्धव ठाकरेंना खोचक टोला; हाती कागद घेऊन खतांच्या किंमतीच वाचल्या

By ऑनलाइन लोकमत | Published: April 23, 2024 01:04 PM2024-04-23T13:04:31+5:302024-04-23T13:05:43+5:30

Loksabha Election 2024 - लोकसभा निवडणुकीच्या दुसऱ्या टप्प्यातील प्रचारात उद्धव ठाकरेंनी शेतकरी सन्मान निधीवरून भाजपावर टीका केली. त्यावर चंद्रकांत पाटील यांनी प्रत्युत्तर दिले आहे.

Chandrakant Patal taunts Uddhav Thackeray; Only the prices of fertilizers were saved by taking the paper in hand | चंद्रकांत पाटलांचा उद्धव ठाकरेंना खोचक टोला; हाती कागद घेऊन खतांच्या किंमतीच वाचल्या

चंद्रकांत पाटलांचा उद्धव ठाकरेंना खोचक टोला; हाती कागद घेऊन खतांच्या किंमतीच वाचल्या

मुंबई - Chandrakant Patil on Uddhav Thackeray ( Marathi News ) यावेळच्या निवडणुकीत ज्याला जे काही तोंडात येईल ते बोलतोय. आकडे माहिती करून घ्यायची नाही. उद्धव ठाकरेंनी विदर्भातील सभेत हास्यास्पद आरोप पंतप्रधानांवर केला. शेतकरी १ लाखाचं खत घेतात, त्यावर १८ टक्के GST म्हणजे १८ हजार घेतात. त्यातलेच ६ हजार तुम्हाला परत देतात असं विधान केले होते. त्यावर भाजपा नेते चंद्रकांत पाटील यांनी उद्धव ठाकरेंनी कधी शेती केलीय का?, खतांच्या किंमती माहिती आहे का? खतांवर किती जीएसटी लागतो हे माहिती आहे का असा प्रश्न केला. 

माध्यमांशी बोलताना चंद्रकांत पाटील म्हणाले की, खतांवर ५ टक्के जीएसटी लागतो आणि तो पुरवठादारापासून थेट शेतकऱ्यांपर्यंत पोहचेपर्यंत इतका कमी होतो, समजा १ लाखाचं खत आहे, त्यावर ५ हजार जीएसटी असते, तेव्हा शेतकऱ्यांपर्यंत येईपर्यंत तो ३००-४०० रुपये होतो. सर्वात महत्त्वाचं म्हणजे, शेतकरी सन्मान निधीतून ज्या शेतकऱ्यांना ६ हजार मिळतात तो अल्पभूधारक शेतकरी, गरीब, मजूर शेतकऱ्यांना मिळतात. त्याला १ लाखाचे खत घ्यावे लागत नाही. ४५ किलोची एक बॅग शेतकरी घेतो तेव्हा त्याला २६६ रुपये द्यावे लागतात. त्यावर कंपनीला अनुदान म्हणून १५६१ रुपये सरकारला द्यावे लागतात, त्यामुळे १९०० चं पोतं शेतकऱ्यांना २६६ रुपयाला मिळते असं त्यांनी म्हटलं.

तसेच शेतीबद्दल काय माहिती नसताना हे बोलणं, १ लाखाचं खत घेणारा हा किती मोठा शेतकरी आहे त्याला शेतकरी सन्मान निधीतून पैसे मिळत नाहीत. काहीही बोलायचं, शेतकऱ्यांना आणि लोकांना भ्रमित करायचे यातून काहीही साध्य होणार नाही. रासायनिक खतांवर ५ टक्के जीएसटी आहे. प्रत्यक्षात १९०० रुपयांचं पोतं २६६ रुपयाला घ्यावे लागते. त्यामुळे तुमच्यानिमित्ताने शेतकऱ्यांना या गोष्टीची माहिती मिळाली असंही चंद्रकांत पाटलांनी म्हटलं.

काय म्हणाले होते उद्धव ठाकरे?

गेल्या १० वर्षात किती शेतकऱ्यांचं उत्पन्न दुप्पट झालंय? किती शेतकऱ्यांना पीकविम्याचे पैसे मिळालेत? शेतकऱ्यांचे अश्रू पुसण्याची दानत भाजपात नाही. विदर्भ हा विकासात मागे राहिला आहे. १० वर्ष तुम्ही केंद्रात होता, मधलं अडीच वर्ष सोडले तर गेल्या १० वर्षात विदर्भाचा विकास का केला नाही. मी मुख्यमंत्री असताना २ लाखापर्यंत कर्जमुक्त केले होते. समजा शेतकऱ्यांनी वर्षाला १ लाखाचे खत घेतले, त्यावर १८ टक्के जीएसटी, म्हणजे १ लाखावर १८ हजार कुणाच्या खिशातले जातात, त्याच्यातले ६ हजार शेतकऱ्यांना देतात, मग उरलेले १२ हजार कुणाच्या खिशात जातात असं विचारतात, तुमचाच खिसा कापून तुम्हाला भीक देतायेत आणि त्यावर उपकार केल्याचा आव आणतायेत असं विधान उद्धव ठाकरेंनी केले होते. 
 

Web Title: Chandrakant Patal taunts Uddhav Thackeray; Only the prices of fertilizers were saved by taking the paper in hand

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.