महाराष्ट्रात कल्याणची जागा आमच्यासाठी सगळ्यात जास्त प्रतिष्ठेची, उद्धव सेनेच्या नेत्या सुषमा अंधारे यांचे वक्तव्य

By मुरलीधर भवार | Published: May 6, 2024 10:01 PM2024-05-06T22:01:59+5:302024-05-06T22:02:40+5:30

कल्याण हा शिवसेनाचा बालेकिल्ला राहिला आहे. त्यामुळे ही जागा आम्ही जिंकणारच असा विश्वास उद्धव सेनेच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी व्यक्त केला आहे.

In Maharashtra, Kalyan's seat is the most prestigious for us, Uddhav Sena leader Sushma Andhare's statement | महाराष्ट्रात कल्याणची जागा आमच्यासाठी सगळ्यात जास्त प्रतिष्ठेची, उद्धव सेनेच्या नेत्या सुषमा अंधारे यांचे वक्तव्य

महाराष्ट्रात कल्याणची जागा आमच्यासाठी सगळ्यात जास्त प्रतिष्ठेची, उद्धव सेनेच्या नेत्या सुषमा अंधारे यांचे वक्तव्य

 कळवा- महाराष्ट्रात कल्याणची जागा आमच्यासाठी सगळ्यात जास्त प्रतिष्ठेची आहे. ज्यांना आम्ही दूध पाजून मोठे केले. तेच आम्हाला डंख मारु लागले. कल्याण हा शिवसेनाचा बालेकिल्ला राहिला आहे. त्यामुळे ही जागा आम्ही जिंकणारच असा विश्वास उद्धव सेनेच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी व्यक्त केला आहे.

कल्याण लाेकसभा मतदार संघातून महाविकास आघाडीतर्फे निवडणूक लढविणाऱ््या वैशाली दरेकर यांच्या प्रचारार्थ उद्धव सेनेच्या नेत्या अंधारे यांची जाहिर सभा आज सायंकाळी पर्याचे मैदान येथे पार पडली. या सभेला राष्टरवादीचे नेते आणि माजी आमदार जितेंद्र आव्हाड यांच्यासह उमेदवार दरेकर, पदाधिकारी सदानंद थरवळ आदी उपस्थित होते.

खासदार शिंदे यांनी मतदार संघात विकास कामे केली आहेत असा दावा केला जात आहे. तर त्यांना आमच्या पक्षातील मंडळी फोडण्याची गरज का भासते आहे. शिंदे सेनेने आमच्या पक्षाती ज्यांना फाेडले आहे. ती मंडळी त्यांच्याकडे मनाने गेलेली नाही. अनेकांवर दबाव टाकून त्यांना पक्षात खेचले आहे. ती मंडळी त्यांच्याकडे केवळ शरीराने आहेत. मनाने ती आमच्याच सोबत असल्याचा दावा अंधारे यांनी यावेळी केला. पक्ष फोडण्याचे काम देवेंद्र फडणवीस यांनी केले असा खुलासा मुख्यमंत्री एकनात शिंदे यांनी विधी मंडळात केला होता. त्यांना उद्धव ठाकरे यांच्यावर बाेलण्याचा अधिकार नाही. 

जे लोक त्यांच्या कुटुंबियांचे झाले नाहीत ते तुमचे काय होतील असा टोला त्यांनी अजित पवार यांना लगावला. उपमुख्यमंत्री फडणवीस हे महिला अत्याचाराची श्वेतपत्रिका का काढत नाही. त्यावर त्यांचे मौन का आहे असा सवाल अंधारे यांनी उपस्थित केला. त्याचबरोबर ही लढाई कुण्या एका पक्षाची उमेदवारीची नसून देशाचे संविधान वाचविण्याची ही लढाई आहे. मुंब्रा मतदार संघात मतदान कमी व्हावे यासाठी मतदान यंत्र हे मंद गतीने चालविले जाते. अशा तक्रारी मुंब्रा शहरातील दौरा करीत असताना मुस्लीम बांधवांनी अंधारे यांच्याकडे केल्या आहे. याकडेही अंधारे यांनी लक्ष वेधले.
 

Web Title: In Maharashtra, Kalyan's seat is the most prestigious for us, Uddhav Sena leader Sushma Andhare's statement

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.