‘पॅसेंजर्स’ चित्रपटातील हैराण करणारे सेट्स

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 8, 2017 02:17 AM2017-01-08T02:17:40+5:302017-01-08T02:17:40+5:30

सिनेमाला भव्यता आणि वास्तविकतेचे रूप देण्यात सर्वात मोठा हात असतो तो त्यामध्ये वापरण्यात येणाऱ्या सेट्सचा.सेट डिझाईनिंग हा चित्रपटातील सर्वात महत्त्वाचा भाग आहे.

Sets of passenger 'passenger' | ‘पॅसेंजर्स’ चित्रपटातील हैराण करणारे सेट्स

‘पॅसेंजर्स’ चित्रपटातील हैराण करणारे सेट्स

googlenewsNext

सिनेमाला भव्यता आणि वास्तविकतेचे रूप देण्यात सर्वात मोठा हात असतो तो त्यामध्ये वापरण्यात येणाऱ्या सेट्सचा.सेट डिझाईनिंग हा चित्रपटातील सर्वात महत्त्वाचा भाग आहे. परंतु त्याबद्दल फार कमी वेळा बोलले जाते. हे सांगण्याचे निमित्त म्हणजे ‘पॅसेंजर्स’ हा जेनिफर लॉरेन्स आणि क्रिस प्रॅट अभिनित सिनेमा.भव्यदिव्य सेट्सची उभारणी यासाठी करण्यात आली आहे. यातील सर्वात मोठा सेट म्हणजे ‘हायबरनेशन बे’चा सेट आहे. सुमारे २२.८ हजार चौ. फुट त्याचे क्षेत्रफळ असून केवळ ९ आठवड्यांतच तो तयार करण्यात आला. तसेच यानाच्या पुढील भागातील वक्र भिंती ‘जिगसॉ पझल’प्रमाणे चार तुकडे जोडून तयार करण्यात यायच्या. तसेच यानातील स्वीट्स तर एकदम पॉश. १.८ हजार चौ. फुटाचा हा स्वीट यानातील सर्वात सुंदर सेट आहे. तो म्हणतो, ‘आतापर्यंत अशी काही गोष्ट आपण कधी पाहिलेली नसल्यामुळे ते पाहण्यात एक वेगळीच मजा असते. आमच्या पाच विभागाच्या संपूर्ण टीमने मिळून हा सेट उभारला असून तो श्वास रोखून ठेवण्यास भाग पाडणारा आहे.मोठ्या पडद्यावर हे सेट्स पाहताना आपण केलेल्या कामाच चीज झाल्याची भावना येते.’ ६ जानेवारीला हा चित्रपट चार भाषांतून भारतात रिलीज झालेला आहे.

Web Title: Sets of passenger 'passenger'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.