‘हे’ स्टार्स! चांगली नोकरी सोडून अभिनयाकडे वळले

By Admin | Published: April 30, 2017 03:35 AM2017-04-30T03:35:52+5:302017-04-30T03:35:52+5:30

शिक्षणाला महत्त्व देणारे बॉलिवूड अ‍ॅक्टर आणि अ‍ॅक्ट्रेस तसे कमीच. शिक्षणाला मध्येच रामराम ठोकून अभिनयाच्या वाटेवर निघालेलेच या इंडस्ट्रीत अधिक मिळतील

'O' stars! Turned off a good job and turned to acting | ‘हे’ स्टार्स! चांगली नोकरी सोडून अभिनयाकडे वळले

‘हे’ स्टार्स! चांगली नोकरी सोडून अभिनयाकडे वळले

googlenewsNext

- Rupali Mudholkar

शिक्षणाला महत्त्व देणारे बॉलिवूड अ‍ॅक्टर आणि अ‍ॅक्ट्रेस तसे कमीच. शिक्षणाला मध्येच रामराम ठोकून अभिनयाच्या वाटेवर निघालेलेच या इंडस्ट्रीत अधिक मिळतील. अर्थात शिक्षण सोडल्याचा पश्चाताप या सगळ्यांना कधीच झाला नाही. कारण ग्लॅमर, पैसा, प्रसिद्धी असे सगळेच या इंडस्ट्रीने त्यांना दिले. ही झाली शिक्षण अर्धवट सोडणाऱ्या बॉलिवूड स्टार्सची गोष्ट. पण बॉलिवूडमध्ये असेही काही जण आहेत, ज्यांनी या इंडस्ट्रीत येण्याआधी शिक्षणाला प्राधान्य दिले. अनेक जण तर वेगळे करिअर सोडून अभिनयाकडे वळलेत. अशाच काही स्टार्सबद्दल आपण जाणून घेणार आहोत.

परिणीती चोप्रा
परिणीती चोप्रा हे नाव आज कुणालाही नवीन नाही. आघाडीच्या अभिनेत्रींमध्ये परिणीतीचे नाव घेतले जाते. पण परिणीती बॉलिवूडमध्ये येण्याआधी यश राज फिल्म्स स्टुडिओमध्ये काम करत होती. पण ते सोडून ती अभिनयाकडे वळली. वयाच्या १७ व्या वर्षी परिणीती लंडनला गेली. मॅनचेस्टर बिझनेस स्कूलमध्ये बिझनेस, फायनान्स आणि इकॉनॉमिक्स अशा तिने पदव्या घेतल्या. येथे शिकत असतानाच मॅनचेस्टर युनाइटेड फुटबॉल क्लबच्या कॅटरिंग डिपार्टमेंटमध्ये टीम लीडर म्हणून ती पार्टटाइम जॉब करायची. यानंतर भारतात परतल्यावर यश राज फिल्म्स स्टुडिओच्या मार्केटिंग डिपार्टमेंटमध्ये पब्लिक कन्सल्टंट म्हणून ती काम करत होती. पण ‘लेडिज वर्सेस रिकी बहल’ या चित्रपटासाठी तिने ही नोकरी सोडली.

विकी कौशल
अभिनेता विकी कौशल हा इलेक्ट्रॉनिक्स आणि टेलिकम्युनिकेशन इंजिनिअर आहे. सन २००९ मध्ये त्याने इंजिनिअरिंगची पदवी घेतली. कॅम्पस मुलाखतीत त्याला एका नामांकित कंपनीची जॉब आॅफर आली. पण ही गलेलठ्ठ पगाराची नोकरी धुडकावून लावत विकी थिएटरकडे वळला. यानंतर त्याने बॉलिवूडमध्ये एन्ट्री घेतली. ‘लव शव ते चिकन खुराना’, ‘बॉम्बे वेल्वेट’, ‘मसान’ आदी चित्रपटांत तो दिसला.

आयुष्यमान खुराणा
आयुष्यमान खुराणा हा इंग्रजी वाङ्मयाचा विद्यार्थी आहे. मास कम्युनिकेशनची मास्टर डिग्री त्याने घेतलीय. पाच वर्षे थिएटर केल्यानंतर आयुष्यमानने रेडिओ जॉकी बनण्याचा निर्णय घेतला. त्याचा हा निर्णय अतिशय योग्य ठरला. या करिअरने आयुष्यमानला प्रचंड लोकप्रियता दिली. यानंतर व्हीजे बनला. यानंतर भारतातील लोकप्रिय होस्ट अशी त्याची ओळख झाली. याच जोरावर २०१२ मध्ये ‘विकी डोनर’ हा चित्रपट आयुष्यमानकडे चालून आला. यानंतर आयुष्यमानने कधीच मागे वळून पाहिले नाही.

जॉन अब्राहम
जॉन अब्राहम हा बॉलिवूडचा अ‍ॅक्शन स्टार म्हणून ओळखला जातो. इकॉनॉमिक्समध्ये जॉनने बॅचलर डिग्री घेतली. यानंतर मॅनेजमेंटमध्ये मास्टर डिग्री केली. मॉडेलिंगमध्ये जॉनने नशीब अजमावले. पण येथे फार काही हाती लागले नाही, म्हटल्यावर एका मीडिया प्लॅनर कंपनीत तो काम करू लागला. पण यानंतर जॉनच्या नशिबाने एकदम कलाटणी घेतली आणि तो बॉलिवूडमध्ये आला.

तापसी पन्नू
तुम्हाला कदाचित माहित नसेल पण तापसी पन्नू हिने कॉम्प्युटर सायन्समध्ये इंजिनिअरिंंग केलेय. यानंतर सॉफ्टवेअर इंजिनिअर म्हणून ती नोकरीला लागली. पण याच दरम्यान चैन्नईत एका टॅलेंट शोमध्ये तिने भाग घेतला आणि तिची निवड झाली. येथून तिची अभिनयाच्या क्षेत्रात एन्ट्री झाली.

रणदीप हुड्डा
रणदीप हुड्डा याने दिल्लीमध्ये पदवीपर्यंतचे शिक्षण घेतले. उच्च शिक्षणासाठी तो मेलबर्नला गेला. बिझनेस मॅनेजमेंटमध्ये त्याने मास्टर डिग्री घेतली. परतल्यावर येथील एका मोठ्या मार्केटिंग फर्ममध्ये तो काम करत होता. २००१ मध्ये रणदीपने ‘मान्सून वेडिंग’ द्वारे बॉलिवूड डेब्यू केले.

रणवीर सिंह
रणवीरला लहानपणापासून अभिनेताच बनायचे होते. मुंबईत कॉलेज शिक्षण पूर्ण केल्यानंतर उच्च शिक्षणासाठी तो अमेरिकेला रवाना झाला. यानंतर मुंबईला परतल्यावर अ‍ॅक्टिंग डेब्यू करण्याआधी रणवीरने कॉपीरायटर म्हणून काम केले. यानंतर यशराज बॅनरच्या ‘बँड बाजा बारात’मध्ये रणवीर दिसला.

Web Title: 'O' stars! Turned off a good job and turned to acting

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.