कंगनाने नाकारली दोन कोटींची फेअरनेस क्रीमची जाहिरात

By Admin | Published: May 25, 2015 11:04 AM2015-05-25T11:04:02+5:302015-05-25T11:35:07+5:30

फेअरनेस क्रीम जाहिरात करुन मी समाजासमोर चुकीचा आदर्श निर्माण केला असता असे सांगत कंगना राणावतने फेअरनेस क्रीमची दोन कोटींची जाहिरात नाकारली आहे.

Kangana denies fairness cream promoted by two crores | कंगनाने नाकारली दोन कोटींची फेअरनेस क्रीमची जाहिरात

कंगनाने नाकारली दोन कोटींची फेअरनेस क्रीमची जाहिरात

googlenewsNext

ऑनलाइन लोकमत

मुंबई, दि. २५ - कोट्यावधींचे मानधन देणा-या फेअरनेस क्रीमची जाहिरात स्वीकारण्यासाठी बॉलीवूडच्या अभिनेत्रींमध्ये नेहमीच चढाओढ असते. पण कंगना राणावत मात्र याला अपवादन ठरली असून फेअरनेस क्रीमची जाहिरात स्वीकारुन समाजात चुकीचा संदेश द्यायचा नाही असे सांगत कंगनाने फेअरनेस क्रीमची दोन कोटी रुपयांची जाहिरात नाकारली आहे. 

क्वीनपाठोपाठ तन्नू वेड्स मन्नू रिटर्न्स या चित्रपटामधील दमदार अभिनयासाठी कंगना राणावतचे सध्या सर्वत्र कौतुक होत आहे. बॉक्स ऑफीसवर कंगनाची चलती बघून अनेक कंपन्या कंगनाला ब्रँड अॅम्बेसेडर बनवण्यास इच्छूक आहेत. काही दिवसांपूर्वी कंगनाला एका ख्यातनाम फेअरनेस क्रीमच्या जाहिरातीती ऑफर आली होती. यासाठी कंगनाला चक्क दोन कोटी रुपयांचे मानधन देण्याची तयारीही कंपनीने दर्शवली होती. मात्र कंगनाने ही जाहिरात नाकारली. मला फेअरनेस ही संकल्पनाच पटत नाही. माझी बहीणही सावळ्या रंगाची असली तरी तीदेखील तितकीच सुंदर दिसते. फेअरनेस क्रीमची जाहिरात करुन मी तिचा अपमान केला असता असे कंगनाने म्हटले आहे. मी सेलिब्रीटी असून समाजासमोर चुकीचा आदर्श ठेवायचा नाही असेही कंगना नमूद करते. जाहिरात निवडताना कंगनाने दाखवलेला हा समजूतदारपणा अन्य कलाकारांसाठी आदर्शवत ठरेल अशी आशा आहे.  

 

Web Title: Kangana denies fairness cream promoted by two crores

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.