SRH vs MI: कठीण सैनिकांची सर्वात कठीण परीक्षा; पराभवानंतर हार्दिकचं खेळाडूंना मार्गदर्शन

IPL 2024 SRH vs MI Updates: सनरायझर्स हैदराबादने मुंबईला नमवून विजयाचे खाते उघडले.

By ऑनलाइन लोकमत | Published: March 28, 2024 04:34 PM2024-03-28T16:34:25+5:302024-03-28T16:36:04+5:30

whatsapp join usJoin us
Ipl Match 2024 SRH vs MI Captain Hardik Pandya tries to boost the morale of the players after Sunrisers Hyderabad beat Mumbai Indians  | SRH vs MI: कठीण सैनिकांची सर्वात कठीण परीक्षा; पराभवानंतर हार्दिकचं खेळाडूंना मार्गदर्शन

SRH vs MI: कठीण सैनिकांची सर्वात कठीण परीक्षा; पराभवानंतर हार्दिकचं खेळाडूंना मार्गदर्शन

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

Hardik Pandya News: आयपीएलच्या यंदाच्या हंगामातील आठवा सामना सनरायझर्स हैदराबाद आणि मुंबई इंडियन्स (SRH vs MI Match) यांच्यात झाला. या सामन्यात यजमान हैदराबादच्या फलंदाजांनी धावांचा पाऊस पाडत विक्रमी २७७ धावसंख्या उभारली. धावांचा यशस्वीरित्या बचाव करून हैदराबादने मुंबईला नमवून विजयाचे खाते उघडले. तगड्या आव्हानाचा पाठलाग करताना मुंबई इंडियन्सने खूप संघर्ष केला. सलामीवीर इशान किशन आणि त्यानंतर तिलक वर्मा यांनी अप्रतिम खेळी करून सामन्यात रंगत आणली. पण विशाल आव्हानापर्यंत पोहोचताना मुंबईच्या शिलेदारांना घाम फुटला.

हैदराबादने दिलेल्या २७८ धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना मुंबईला घाम फुटला. मुंबईचा संघ निर्धारित २० षटकांत ५ बाद २४६ धावा करू शकला आणि सामना ३१ धावांनी गमावला. २७८ धावांच्या तगड्या आव्हानाचा पाठलाग करताना मुंबईच्या फलंदाजांनी चांगला संघर्ष केला. हैदराबाद आणि मुंबई या सामन्यात एकूण ५२३ धावा झाल्या. मुंबईच्या संघाने २४६ तर हैदराबादने २७७ धावा कुटल्या.

हैदराबादने उभारली सर्वाधिक धावसंख्या 
आयपीएलच्या इतिहासातील सर्वाधिक धावसंख्या उभारून हैदराबादच्या संघाने इतिहास रचला. सामन्यानंतर मुंबईच्या संघाच्या मीटिंगमध्ये बोलताना कर्णधार हार्दिक पांड्याने खेळाडूंचे मनोबल वाढवण्याचा प्रयत्न केला. तो म्हणाला की, सर्वात कठीण सैनिकांची सर्वात कठीण परीक्षा असते... आपण या स्पर्धेतील सर्वात मजबूत संघ आहोत. फलंदाजीची बाजू असो की मग एकूणच मुंबई इंडियन्स म्हणून आपण जिथे पोहोचलो होतो तिथपर्यंत अद्याप कोणीच येऊ शकले नाही. तर, सचिन तेंडुलकर म्हणाला की, प्रतिस्पर्धी संघाने एवढी मोठी धावसंख्या उभारूनही कोण जिंकेल याबाबात कोणीच स्पष्ट सांगू शकत नव्हते... म्हणजेच आपणही चांगली कामगिरी केली.

दरम्यान, बुधवारी सनरायझर्स हैदराबादच्या तीन फलंदाजांनी जलद अर्धशतक झळकावण्याची किमया साधली. ट्रॅव्हिस हेड (१८ चेंडू) अभिषेक शर्मा (१६ चेंडू) आणि हेनरिक क्लासेनने (२४) चेंडूत अर्धशतक झळकावले. हैदराबादने उभारलेली २७७ ही धावसंख्या आयपीएलच्या इतिहासातील सर्वाधिक धावसंख्या ठरली आहे. तर, आव्हानाचा पाठलाग करताना मुंबईने २४६ धावा करून लक्ष्याचा पाठलाग करताना सर्वाधिक धावा करण्याचा विक्रम आपल्या नावावर केला. खरं तर आयपीएलच्या एकाच सामन्यात सर्वाधिक षटकार या सामन्यात पाहायला मिळाले. या सामन्यात दोन्ही संघांनी मिळून ३८ षटकार ठोकले.

Web Title: Ipl Match 2024 SRH vs MI Captain Hardik Pandya tries to boost the morale of the players after Sunrisers Hyderabad beat Mumbai Indians 

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.