IPL 2024 SRH vs MI: १६ चेंडूत ५० धावा! अभिषेक शर्मा सुस्साट; मुंबईची बेक्कार धुलाई

IPL 2024 SRH vs MI Live: ट्रॅव्हिस हेडच्या वादळाने मुंबईची चांगलीच धुलाई केली.

By ऑनलाइन लोकमत | Published: March 27, 2024 08:31 PM2024-03-27T20:31:27+5:302024-03-27T20:33:27+5:30

whatsapp join usJoin us
Ipl Match 2024 live score SRH vs MI abhishek sharma 50 runs in just 16 balls against Mumbai indians | IPL 2024 SRH vs MI: १६ चेंडूत ५० धावा! अभिषेक शर्मा सुस्साट; मुंबईची बेक्कार धुलाई

IPL 2024 SRH vs MI: १६ चेंडूत ५० धावा! अभिषेक शर्मा सुस्साट; मुंबईची बेक्कार धुलाई

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

IPL 2024 SRH vs MI Live Updates In Marathi | हैदराबाद: यजमान सनरायझर्स हैदराबादकडून ट्रॅव्हिस हेडने धुलाई केल्यानंतर अभिषेक शर्माने देखील हात साफ केले. मुंबईचा कर्णधार हार्दिक पांड्याने युवा गोलंदाजाला पहिले षटक टाकण्याची संधी दिली. खरं तर आज मुंबईने १७ वर्षीय गोलंदाजाला मैदानात उतरवले. पण त्याची चांगलीच धुलाई झाली. १९ वर्षाखालील विश्वचषकात चमक दाखवणाऱ्या क्वेना महाकाला हैदराबादविरूद्धच्या सामन्यात संधी मिळाली. परंतु, या युवा खेळाडूची चांगलीच धुलाई झाली. मुंबईचा कर्णधार हार्दिक पांड्याने मफाकाला पहिले षटक टाकायला दिले.

पहिल्याच षटकापासून ट्रॅव्हिस हेडने स्फोटक खेळी करायला सुरूवात केली. आज सनरायझर्स हैदराबाद आणि मुंबई इंडियन्स यांच्यात सामना होत आहे. हैदराबाद येथील राजीव गांधी आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर हा सामना खेळवला जात आहे. मुंबई इंडियन्सचा कर्णधार हार्दिक पांड्याने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. दोन्हीही संघांनी प्लेइंग इलेव्हनमध्ये बदल केला. यजमान संघात ट्रॅव्हिस हेड आणि जयदेव उनाडकट यांची एन्ट्री झाली आहे. तर मुंबईच्या संघात ल्यूक वुडच्या जागी Kwena Maphaka ला संधी मिळाली आहे. प्रथम फलंदाजीला आलेल्या यजमानांनी मुंबईची चांगलीच धुलाई केली. ट्रॅव्हिस हेडने अवघ्या १८ चेंडूत ५० धावा करून ऐतिहासिक खेळी केली. हैदराबादकडून सर्वात जलद अर्धशतक झळकावणारा तो खेळाडू ठरला पण त्याचा हा विक्रम काही मिनिटांतच अभिषेक शर्माने तोडला. हैदराबादने पहिल्या ७ षटकांतच १०० धावांचा आकडा गाठला.

अभिषेक शर्माने अवघ्या १६ चेंडूत अर्धशतक झळकावण्याची किमया साधली. अभिषेक शर्माने ७ षटकार आणि ३ चौकारांच्या मदतीने २३ चेंडूत ६३ धावांची स्फोटक खेळी केली. आयपीएलच्या इतिहासात पहिल्या १० षटकात सर्वाधिक धावा करण्याचा विक्रम देखील या सामन्यात झाला. सनरायझर्स हैदराबादने १० षटकांच २ बाद १४८ धावा करून मुंबई इंडियन्सच्या गोलंदाजांचा चांगलाच समाचार घेतला. 

आजच्या सामन्यासाठी हैदराबादचा संघ -
पॅट कमिन्स (कर्णधार), मयंक अग्रवाल, राहुल त्रिपाठी, एडन मार्करम, हेनरिक क्लासेन (यष्टीरक्षक), अब्दुल समद, शाहबाज अहमद, ट्रॅव्हिस हेड,  भुवनेश्वर कुमार, मयंक मार्कंडेय आणि जयदेव उनाडकट. 

आजच्या सामन्यासाठी मुंबईचा संघ -
हार्दिक पांड्या (कर्णधार), रोहित  शर्मा, इशान किशन, तिलक वर्मा, टीम डेव्हिड, नमन धीर, गेराल्ड कोएत्झी, जसप्रीत बुमराह, पियुष चावला, शम्स मुलाणी, क्वेना महाका.

Web Title: Ipl Match 2024 live score SRH vs MI abhishek sharma 50 runs in just 16 balls against Mumbai indians

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.