SRH vs RCB Live : विराट कोहली फिदीफिदी हसला, काव्या मारनचा चेहरा पडला! पाहा नेमकं काय घडलं 

काव्या मारन हिच्या चेहऱ्यावरील हास्य गायब झाले. तेच विराट कोहली फिदीफिदी हसताना दिसला. 

By ऑनलाइन लोकमत | Published: April 25, 2024 09:58 PM2024-04-25T21:58:55+5:302024-04-25T21:59:37+5:30

whatsapp join usJoin us
IPL 2024, Sunrisers Hyderabad vs Royal Challengers Bengaluru Live Marathi : SRH 56/4 IN 5 OVERS, Virat Kohli smiled, Kavya Maran look upset, know what happened | SRH vs RCB Live : विराट कोहली फिदीफिदी हसला, काव्या मारनचा चेहरा पडला! पाहा नेमकं काय घडलं 

SRH vs RCB Live : विराट कोहली फिदीफिदी हसला, काव्या मारनचा चेहरा पडला! पाहा नेमकं काय घडलं 

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

IPL 2024, Sunrisers Hyderabad vs Royal Challengers Bengaluru Live Marathi : प्रथम फलंदाजी करून प्रतिस्पर्धींसमोर धावांचा डोंगर उभा करणारा सनरायझर्स हैदराबादचा संघ लक्ष्याचा पाठलाग करताना मात्र चाचपडतो. आयपीएलमध्ये आतपर्यंत त्यांना एकदाच २००+ धावांचा यशस्वी पाठलाग करता आला आहे, तर १२ वेळा पराभव पत्करावा लागला आहे. आजही त्यांची हालत खराब झालेली दिसतेय आणि त्यामुळे मालकीण काव्या मारन हिच्या चेहऱ्यावरील हास्य गायब झाले. तेच विराट कोहली फिदीफिदी हसताना दिसला. 


विराट कोहलीने सातत्य कायम राखताना आणखी एक अर्धशतक पूर्ण केले, परंतु त्याचा स्ट्राईक रेट ११८ च्या आसपास असल्याने RCB च्या धावांचा वेग मंदावला. रजत पाटीदारने २० चेंडूंत ५० धावा चोपून काढताना RCB ला आशेचा किरण दाखवला होता. पण, SRH चा अनुभवी गोलंदाज जयदेव उनाडकटने स्लोव्हर चेंडूचा मारा करून विराट व रजत यांना चतुराईने बाद केले. रजत व विराट यांनी ३४ चेंडूंत ६५ धावांची भागीदारी केली. रजतने २० चेंडूंत २ चौकार व ५ षटकारांसह ५० धावा केल्या. विराटने ४३ चेंडूंत ४ चौकार व १ षटकारासह ५१ धावा केल्या. जयदेवने त्याच्या १००व्या आयपीएल सामन्यात ४ षटकांत ३० धावा देऊन ३ विकेट्स घेतल्या. 


कॅमेरून ग्रीनने २० चेंडूंत ५ चौकारांसह नाबाद ३७ धावा केल्या, तर इम्पॅक्ट प्लेअर स्वप्निल सिंगने ( १२) धावा करून संघाला ७ बाद  २०६ धावांपर्यंत पोहोचवले. आज सनरायझर्सला अपेक्षित सुरुवात नाही मिळाली आणि त्यांचा स्टार फलंदाज ट्रॅव्हिस हेड ( १) विल जॅक्सच्या फिरकीवर विकेट देऊन माघारी परतला.  यानंतर विराटचं सेलिब्रेशन पाहण्यासारखं होतं. पण, त्याच जॅक्सच्या पुढच्या षटकात अभिषेक शर्माने ४,६,२,१,६ अशा धावा काढल्या. चौथ्या षटकात यश दयालने SRH च्या धावगतीला ब्रेक लावला. अभिषेक १३ चेंडूंत ३ चौकार व २ षटकारांसह ३१ धावांवर झेलबाद झाला. 


इम्पॅक्ट खेळाडू स्वप्निलने त्याच्या पहिल्याच षटकात हैदराबादला विकेट मिळवून दिली. त्याने एडन मार्करमला ( ७) फुलटॉस चेंडूवर पायचीत करून माघारी पाठवले आणि हैदराबादला ४१ धावांवर तिसरा धक्का दिला. त्याच षटकाच्या शेवटच्या चेंडूवर हेनरिच क्लासेनने ( ७) विकेट मिळवून दिली. स्वप्निलच्या त्या षटकात १९ धावा आल्या, परंतु त्याने दोन महत्त्वाच्या विकेट मिळवल्या. त्यामुळे विराट कोहली जबरदस्त सेलिब्रेशन करत होता, तर काव्याचा चेहरा पडलेला.  
 

Web Title: IPL 2024, Sunrisers Hyderabad vs Royal Challengers Bengaluru Live Marathi : SRH 56/4 IN 5 OVERS, Virat Kohli smiled, Kavya Maran look upset, know what happened

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.