मतदान करू दिले नाही म्हणून वृद्धाची पाण्याच्या टाकीवर चढून विरुगिरी - तालुक्यातील ग्राम बबई येथील घटना

By अंकुश गुंडावार | Published: April 19, 2024 06:56 PM2024-04-19T18:56:27+5:302024-04-19T19:01:45+5:30

Lok Sabha Election 2024: नक्षलग्रस्त भागात ऐन ३ वाजता मतदान संपल्यावर वृद्धाला मतदानास थांबवल्याने वृद्धाची पाण्याच्या टाकीवर चढून विरुगिरी

In Goregaon where an old man climbed on a water tank because he was not allowed to vote | मतदान करू दिले नाही म्हणून वृद्धाची पाण्याच्या टाकीवर चढून विरुगिरी - तालुक्यातील ग्राम बबई येथील घटना

Bhandara polling booth

गोरेगाव :भंडारा-गोंदिया लोकसभा मतदारसंघासाठी शुक्रवारी (दि.१९) मतदान प्रक्रिया पार पडत असतानाच ३ वाजता केंद्रावर गेलेल्या वृद्धाला मतदान करू दिले नाही. यामुळे त्याने पाण्याच्या टाकीवर चढून विरुगिरी केली.

गोंदिया जिल्ह्यातील अर्जुनी-मोरगाव आणि आमगाव हे दोन्ही विधानसभा मतदारसंघ नक्षलग्रस्त असल्याने या दोन्ही विधानसभा मतदारसंघांत ३ वाजेपर्यंतच मतदान प्रक्रिया घेण्यात आली. अशात ऐन ३ वाजता ग्राम बबई येथील रहिवासी वृद्ध सुखराम रहांगडाले (६२) मतदानासाठी केंद्रावर गेले. मात्र, मतदानाची वेळ झाल्याचे सांगून त्यांना मतदान करू दिले नाही. या प्रकारामुळे रागाविलेल्या सुखराम यांनी पाण्याच्या टाकीवर चढून विरूगिरी केली. याची माहिती गोरेगाव पोलिसांना मिळताच पोलिस निरीक्षक अजय भुसारी यांनी तात्काळ घटनास्थळ गाठत सुखराम यांची समजूत काढण्याचा प्रयत्न केला व अर्ध्या तासानंतर त्यांना खाली उतरविण्यात पोलिसांना यश आले. सुखराम यांना गोरेगाव पोलिसांनी पोलिस स्टेशन येथे नेले व गुन्हा नोंद करण्याची प्रक्रिया सुरू होती.

Web Title: In Goregaon where an old man climbed on a water tank because he was not allowed to vote

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.